Header Ads

OBC Melava : नांदेडमध्ये छगन भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, काळे झेंडे दाखवले ; कार्यकर्ते अटकेत


OBC Melava : नांदेडमध्ये छगन भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, काळे झेंडे दाखवले; कार्यकर्ते अटकेत

OBC Melava : नांदेडमध्ये छगन भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, काळे झेंडे दाखवले; कार्यकर्ते अटकेतअर्धापूरजवळील पिंपळगाव पाटीजवळ भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आणि काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी तीन कार्यकर्त्यांना अटक केल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी वाट मोकळी करुन दिल्याने भुजबळ हिंगोलीकडे रवाना झाले.


दुसरीकडे रविवारी सकाळीच स्वराज्य संघटनेने भुजबळांची सभा उधळून लावण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे हिंगोली येथे सभास्थळी आणि नांदेड विमानतळावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. जालन्याच्या अंबडमध्ये पहिल्या सभेत भुजबळांनी आक्रमक भाषण केल्याने त्यांचा निषेध केला जात आहे.


मराठा आरक्षणाचा लढ एकीकडे सुरु असताना छगन भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे.


छगन भुजबळ यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे आणि बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''आमची सभा घेण्यासाठी कुणीही रोखू शकत नाही, ओबीसी समाज जशास तसं उत्तर देईल आणि भुजबळांची सभा होईल. मनोज जरांगेंनी आंदोलकांना आवरावं'' असं आवाहन त्यांनी केलं.

साभार सौजन्य मुंबई तक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.