Header Ads

Pune Crime: शुटर संतोष नावाने पुण्यातील व्यावसायिकाला खंडणी मागितल्याचा प्रकार

Pune Crime: शुटर संतोष नावाने पुण्यातील व्यावसायिकाला खंडणी मागितल्याचा प्रकार 

Pune Crime: शुटर संतोष नावाने पुण्यातील व्यावसायिकाला खंडणी मागितल्याचा प्रकार
Pune Crime: पुणे : प्रसिद्ध गायक सिद्धु मुसेवाला (sidhu moosewala) याच्या (Pune Crime News) हत्या प्रकरणातील शार्प शुटर संतोष जाधव याच्या नावाने पुण्यातील एका व्यावसायिकाला खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. संतोष जाधन नावाने फोन करुन त्याने व्यावसायिकाला फोन करुन तुम्हाला मारण्यासाठी 15 लाखांची सुपारी दिल्याचं सांगितलं आणि त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. 


हा प्रकार लक्षात येताच कोथरुड परिसरातील 34 वर्षीय व्यावसायिकाने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला प्रकार सांगून तक्रार दिली आहे. पुण्यातील कोथरुडचे हे व्यावसायिक मागील काही दिवसांपासून आजारी आहे. त्यामुळे ते घरातच असतात. घरी असताना त्यांना फोन करुन धमकी दिल्याचं त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. 


तक्रारीनुसार, या तरुणाने फोन केला आणि सिद्धु मुसेवाला कांड ऐकला आहे का, मी संतोष जाधव बोलत आहे. तुझ्या नावाची 15 लाखांची सुपारी मिळाली आहे. तुझा जीव हवा असेल तर तू किती देतोस बोल. पैसे नाही दिले तर गोळ्या घालेन, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. तुझ्या घरच्यांना बायका पोरांना मारेन, तुला दिवाळी साजरी करायची असेल तर आता 50 हजार दे असे म्हणून पुन्हा धमकावले.


पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या करण्यात आली होती. ही हत्या करण्यासाठी पुणे जिल्ह्यातील शार्प शूटर संतोष जाधव व त्याच्या साथीदाराला सुपारी देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला गुजरातमधून अटक करुन त्याच्यावर मकोका कारवाई करण्यात आली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.