Satkar: ऑनलाईनच्या फसव्या व प्रलोभन दाखविणार्‍या जाहिरातीपासून दूर राहिले पाहिजे - प्रकाश कनोजे

Darshak
0

 Satkar: कनोजिया परदेशी समाजाच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

Satkar: ऑनलाईनच्या फसव्या व प्रलोभन दाखविणार्‍या जाहिरातीपासून दूर राहिले पाहिजे - प्रकाश कनोजे     Satkar: अहमदनगर (प्रतिनिधी)  -  मोबाईलने जग जवळ आले असले तरी माणुस माणसापासून दूर होत आहे. सध्या ग्लोबलायझेशनमुळे युवक-युवतींवर अनेक दुष्परिणाम होताना दिसत आहेत. मोबाईलचा अतिवापर ही सर्वांचीच समस्य होऊन बसली आहे. यासाठी मुलांना मैदानी खेळ तर पालकांनी पारिवारिक संबंध दृढ करणे गरजेचे आहे. 


आज मोबाईलवरील आकर्षित करणार्‍या जाहिरातींमधून मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यासाठी प्रत्येकाने जागृत राहून अशा फसव्या व प्रलोभन दाखविणार्‍या जाहिरातीपासून दूर राहिले पाहिजे. ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनामुळे अनेक युवक-युवती बरबाद झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे परिवार-समाजाातील संवाद वाढल्यास अशा अनावश्यक गोष्टींना पायबंद बसेल, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कनोजे यांनी केले.


     नगरमधील कनोजिया परदेशी समाजाच्यावतीने भिंगार येथील देशमुख मंगल कार्यालयात समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कनोजे (नाशिक), प्रा.डॉ.केवलकृष्ण कनोजिया, समाजाचे अध्यक्ष राजकुमार परदेशी आदि मान्यवर उपस्थित होते.


     यावेळी इ.10 वी मधील वराही रोहित परदेशी व इ. 12 वी रश्मी राजेश कनोजिया, समक्ष अनिल कनोजिया (रनिंग), सलोनी कनोजिया-किल्लेकर (बी.एड्.), अशोक बाबुलाल परदेशी (सेवानिवृत्त), विनोद लक्ष्मण कनोजिया (सेवानिवृत्त), यश गणेश परदेशी (एनसीसी-दिल्ली परेड) आदिंसह समाजातील गुणवंत 38 विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


     याप्रसंगी राजकुमार परदेशी म्हणाले, गेल्या 19 वर्षांपासून समाजातील गुणवंतांचा सन्मान करुन त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देण्याचे काम समाजाच्यावतीने होत आहे. विविध उपक्रमांतून समाजाची सर्वांगिण प्रगती साधण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.


     कार्यक्रम यशस्वीतेसाठी बिहारीलाल कनोजिया, प्यारेलाल कनोजिया, हिरालाल परदेशी, राजेंद्र कनोजिया, कुंदन परदेशी, दिनेश चौधरी, रवी कनोजिया, धिरज परदेशी, सुरज कनोजिया, सतीश कनोजिया, अजय कनोजिया, दिनेश परदेशी, दिनेश कनोजिया आदिंनी परिश्रम घेतले.


     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद कनोजिया यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन व आभार ठाकूरदास परदेशी यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top