Header Ads

Satkar: छंदामुळे इशा लांडे स्पर्धेत अव्वल ठरली-प्रमोद छाजेड


Satkar:  स्नेह 75 च्या वतीने प्रोत्साहन -प्रेरणा देण्यासाठी सन्मान


Satkar: छंदामुळे इशा लांडे स्पर्धेत अव्वल ठरली-प्रमोद छाजेड     Satkar:  अहमदनगर (प्रतिनिधी)  -  प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातात कला, कौशल्य काही तरी वेगळे करुन दाखविण्याचे  गुण असतात, त्या गुणांना योग्य दिशा दाखविली तर त्याचा विकास होतो. वन्य पशु-पक्षांवर प्रेम करुन त्यांच्या विषयी असणारे प्रेम, दया, भावना इशा लांडे दाखवत असल्याने वन्यजीवांचे उत्कृष्ट छायाचित्रे काढू शकली. 


पशु-पक्षांची छायाचित्रे काढण्याच्या छंदामुळे कॅनन इंडिया वाईल्ड व्हिजन्स आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून अव्वल ठरली, याचा सर्वांनाच अभिमान आहे, असे प्रतिपादन एलआयसीचे प्रतिनिधी प्रमोदकुमार छाजेड यांनी केले.


     नगर येथील इ.10वी ची विद्यार्थीनी कु.ईशा लांडे हिने ‘कोल्ह्याने केलेली शिकार’ या छायाचित्रास राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तिला प्रोत्साहन-प्रेरणा देण्यासाठी स्नेह 75 च्यावतीने सन्मान करण्यात आला. याप्रसंगी प्रमोदकुमार छाजेड, इंजि.ऋषीकेश लांडे, अभय गांधी, विश्वनाथ पोंदे, डॉ.शशी उदास, सौ.रजनी ढोरजे, किशोर रेणाविकर आदि उपस्थित होते.


     श्री.छाजेड म्हणाले, कमी वयात कु.ईशा लांडे हीने मिळविलेले राष्ट्रीय स्पर्धेत मिळविलेले यश कौतुकास्पद असेच आहे. या यशातून तिला पुढील दिशा ठरविण्यास मोठी मदत होणार आहे. आपले ध्येय अचूक ठेवले की यश नक्कीच मिळते. फोटोग्राफित संयम आणि तत्परता हा महत्वाचा भाग आहे, त्यांचा पुरेपुर उपयोग कु.ईशाने केला व ती यशस्वी झाली. याचा सर्वांनाच अभिमान आहे.


     सत्कारास उत्तर देतांना ईशा लांडे म्हणाली, वडिल वन्यजीव छायाचित्रकार असल्याने पशु-पक्षांशी नेहमीच संबंधी येतो. पशु-पक्षांवर उपचार करत असताना मी वडिलांना मदत करते, त्यामुळे पशु-प्राण्यांबद्दल प्रेम असल्याने त्यांचे छायाचित्रे मी नेहमी काढत असते. या छंदातूनच नगर परिसरात भटकंती करतांना कोल्हा तोंडात मृत प्राण्याचा सांगडा घेतलेला दिसला व मी फोटो क्लिक केला. 


चांगला फोटो मिळाल्याने तो स्पर्धेसाठी पाठवला व त्याला राष्ट्रीय स्तरावरील बक्षिस मिळाले. या गोष्टीचा मोठा आनंद वाटतो. स्नेह 75 च्यावतीने केलेल्या सन्मानामुळे आपणास प्रेरणा मिळणार असल्याचे कु.ईशाने सांगितले. शेवटी ऋषीकेश लांडे यांनी सर्वांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.