Satkar: प्रा. गाडेंनी कायम सर्वसामान्यांच्या हिताचे काम केले - किरण काळे

Darshak
0

 Satkar: शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशीकांत गाडेंचे सर्वपक्षीय नेत्यांकडून अभिष्टचिंतन 

Satkar:  प्रा. गाडेंनी कायम सर्वसामान्यांच्या हिताचे काम केले - किरण काळे Satkar: अहमदनगर (प्रतिनिधी)  : शिवसेना (उद्धव ठाकरे गट) जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांचे वाढदिवसानिमित्त सर्वपक्षीय नेत्यांनी अभिष्टचिंतन केले. यावेळी माजी मंत्री, भाजप नेते प्रा. राम शिंदे व शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी त्यांना हार घालून शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व पक्षीय नेत्यांमध्ये शाब्दिक कोट्या करण्याचा खेळ रंगला. सर्वांनी एकमेकांना हासून मनमुराद दाद दिली. गाडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व पक्षीय नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी दिवाळी फराळाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. 


सत्कारा नंतर बोलताना काळे म्हणाले की, गाडे सरांनी शिवसेना नगर तालुक्यासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये रुजवली. स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सर्वसामान्य माणसापर्यंत त्यांनी नेला. त्यांनी कायम सर्वसामान्य जनतेचे हित मध्यवर्ती ठेवून काम केलं. अनेक कार्यकर्ते घडवले. तालुक्याच्या हिताची लढाई त्यांनी संघर्षातून उभी केली. सत्ता असो किंवा नसो त्यांना कार्यकर्त्यांच भरभरून प्रेम मिळालं. दिवाळी फराळ व वाढदिवसाच्या निमित्ताने विविध पक्षातील राजकीय नेते एकत्र आलेले पहायला मिळाल्या मुळे जिल्हात त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.


यावेळी माजी मंत्री प्रा. शिंदे, किरण काळे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब हराळ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा शिवसेना जिल्हा उपप्रमुख संदेश कार्ले, मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र भैय्या गंधे, 


अहमदनगर शहर अल्पसंख्यांक ब्लॉक काँग्रेस विभाग अध्यक्ष चंद्रकांत उजागरे, सुवेंद्र गांधी, जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष संपतराव म्हस्के, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब गुंजाळ, रमाकांत गाडे, ॲड. अभिषेक भगत आदींसह नगर शहर, नगर तालुक्याबरोबरच जिल्ह्यातील नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top