Header Ads

Savedi : सामाजिक उपक्रमातून काका शेळके यांचा वाढदिवस साजरा

 

Savedi : राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव


Savedi : राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव      Savedi : अहमदनगर (प्रतिनिधी)  - नेते, पुढारी, सामाजिक कार्यकर्ते यांचा वाढदिवस म्हटलं की शुभेच्छा फलक आले, अभिष्टचिंतन सोहळ्याचा मोठा कार्यक्रम, डीजे सिस्टीम यासाठी मोठा खर्च केला जातो. परंतु सामाजिक कार्यकर्ते सूर्या फाउंडेशनचे अध्यक्ष व मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे नगर शहर उपाध्यक्ष काका शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अनावश्यक खर्चांना फाटा देत आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा केला.


     यामध्ये रक्तदान शिबिरामध्ये शंभर रक्त पिशव्यांचे अर्पण ब्लड बँकेच्यावतीने रक्त संकलन करण्यात आले. त्यानंतर आठरे पाटील बालगृहांमध्ये विद्यार्थ्यांना भोजन तसेच शालेय शिक्षणासाठी वह्याचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगरसेविका कलावती शेळके अनिकेत कराळे, राजेंद्र तागड, निशांत दातीर, मयूर गायकवाड, शुभम कुलकर्णी, रवी राऊत, अमोल बगोड, अनिकेत ओझा, संग्राम शेळके, भाऊ पगारे ,केदार हजारे, निशांत ढोणे, तुषार यादव, भाना शिंदे व कार्यकर्ते उपस्थित होते.


     याप्रसंगी दिलीप सातपुते म्हणाले, काका शेळके यांनी नेहमीच सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देत जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. विशेषत: मुख्यमंत्री सहाय्यता निधींच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना उपचारसाठी मोठी मदत मिळवून दिली आहे. ते आपला वाढदिवस हा नेहमीच सामाजिक उपक्रमातून साजरा करतात ही कौतुकास्पद बाब आहे. या सामाजिक उपक्रमांचा समाजातील गरजूंना मोठा फायदा होत असल्याने अशा उपक्रमांची आज गरज असल्याचे त्यांनी सांगून काका शेळके यांना वाढदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा दिल्या.


     दिवसभरातील विविध सामाजिक उपक्रमास शिवसेना शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक योगिराज गाडे, माजी महापौर अभिषेक कळमकर आदिंसह मान्यवरांनी वाढदिवसानिमित्त भेट देऊन, उपक्रमास शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.