Header Ads

Sindhi Samaj: भारतीय सिंधू सभेच्या वतीने रविवारी‘सिंधियत जो सफरनामो’ कार्यक्रम

 Sindhi Samaj: भारतीय सिंधू सभेच्या वतीने रविवारी‘सिंधियत जो सफरनामो’ कार्यक्रम


       

Sindhi Samaj: भारतीय सिंधू सभेच्या वतीने रविवारी‘सिंधियत जो सफरनामो’ कार्यक्रम

Sindhi Samaj: अहमदनगर (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी, मुंबई व भारतीय सिंधू सभेच्या नगर शाखेच्यावतीने येत्या रविवार दि.26 नोव्हेंबर 2023 रोजी ‘सिंधीयत जो सफरनामो’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे नगर-मनमाड रोडवरील वृंदावन लॉन्स, नगर येथे सायंकाळी 6 ते 11 या वेळेत आयोजन केले आहे.


     या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देतांना भारतीय सिंधू सभाचे जिल्हाध्यक्ष दामोदर बठेजा म्हणाले, सिंधी समाजाची सभ्यता व संस्कृतीची झलक स्थानिक महिला मंडळाच्यावतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे सादर होतील. 


तसेच या प्रसंगी सिंधी व्यंजन, मेहंदी, रांगोळी, नेल आर्ट, जनरल नॉलेज व लहान मुलांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, विजेत्यांना पारितोषिके दिली जातील. तसेच विविध मनोरंजनाचे कार्यक्रम, पपेट शो, तंबोला आदि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्री.बठेजा यांनी सांगितले.


     सदर कार्यक्रमासाठी भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य दादा लधाराम नागवाणी, राज्य सिंधी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष महेश सुखरामानी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


     तरी वरील सर्व कार्यक्रमास समाजबांधवानी, मित्र परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय सिंधू सभेच्यावतीने करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.