Header Ads

Vishwa Bharti College: ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये भारताची उत्तुंग कामगिरी-अभय राजे

Vishwa Bharti College: विश्वभारती कॉलेजमध्ये ‘भारतातील वाहन उद्योगाची जडण-घडण’ या विषयावर व्याख्यान

Vishwa Bharti College: विश्वभारती कॉलेजमध्ये ‘भारतातील वाहन उद्योगाची जडण-घडण’ या विषयावर व्याख्यान
     Vishwa Bharti College: अहमदनगर (प्रतिनिधी): स्वातंत्र्योत्तर काळापासून भारत देश ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी मोठी बाजारपेठ राहिला असून, 21 व्या शतकात खाजगीकरणाचे वारे वाहून लागल्यानंतर भारताने वाहन क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली आहे, यापुढील काळात वाहन व्यवसाय अत्यंत तेजीत राहणार असून, भारतातील तरुण अभियंतांनी या संधीचा मोठ्या प्रमाणात फायदा करुन घेणे गरजेचे आहे, असे मत द इन्स्टिट्युटशन ऑफ इंजिनिअर्सचे सचिव अभय राजे यांनी व्यक्त केले.


     जामखेड रोडवरील विश्वभारती अ‍ॅकेडमीज् कॉलेज ऑफ इंजिनिअररिंगमध्ये ‘भारतातील वाहन उद्योगाची जडण-घडण’ या विषयावर अभय राजे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्री.खैरे, प्राचार्या  वैशाली धोंगडे, मॅकेनिकल विभागाचे प्रा.संदिप गुंदेचा आदि व्यासपीठावर उपस्थित होते.


     पुढे बोलतांना अभय राजे यांनी मागील 125 वर्षांच्या वाहन उद्योगाच्या प्रवासावर प्रकाश टाकला. वाहन उद्योगातील विविध संशोधन, वाहनांचे विविध प्रक़ार, विविध कंपन्या व त्यांची भारतातील गुंतवणुक तसेच वाहन निर्मितीमध्ये नवनवीन तंत्रज्ञान व त्यातून निर्माण होणार्‍या भविष्यातील संधी यावर भाष्य केले.


     याप्रसंगी प्राचार्या वैशाली धोंगडे म्हणाल्या, विश्वभारती कॉलेजच्यावतीने विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, आपण करत असलेल्या अभ्यासाची देश-विदेशात सद्य स्थिती काय आहे, भविष्यातील संधी याचे अवलोकन विविध उपक्रमातून केले जात असल्याचे सांगितले.


     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संदिप गुंदेचा यांनी केले. या व्याख्यानास विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.