Ward No 2: नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पुर्तता कामाच्या माध्यमातून पुर्णत्वाकडे - विनित पाउलबुधे

Darshak
0

Ward No 2:  प्रभाग 2 मधील सूर्यनगर अंतर्गत रस्त्यांच्या कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ

Ward No 2:  प्रभाग 2 मधील सूर्यनगर अंतर्गत रस्त्यांच्या कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ


         Ward No 2:   अहमदनगर (प्रतिनिधी)  -  प्रत्येक नागरिकाला चांगले रस्ते, पाणी, वीज, ड्रेनेज असे प्रश्न मार्गी लागणे महत्वाचे असते. शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता या सुविधा पुरविण्याकडे लोकप्रतिनिधींसह, मनपा नगरसेवक प्रयत्न करतात. प्रभाग हा विस्ताराने मोठा असला तरी आम्ही चारही नगरसेवक कामे करण्याबाबत मागे हटत नाही. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पुर्तता कामाच्या माध्यमातून पुर्ण करीत आहोत, असे प्रतिपादन नगरसेवक विनित पाउलबुधे यांनी केले.


     प्रभाग 2 मधील सूर्यनगरमधील अंतर्गत रस्त्यांचा मजबुतीकरण, डांबरीकरण, कॉक्रीटीकरण कामाचा शुभारंभ नगरसेवक विनित पाउलबुधे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. याप्रसंगी नगरसेवक सुनिल त्र्यंबके, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, नगरसेविका पल्लवी जाधव, सोपान वायभासे, दत्तात्रय जाधव, एकनाथ खेडकर, रत्नकांत क्षीरसागर, शिवाजी फुंदे, राजेंद्र कुलकर्णी, सुभाष तळेकर, सागर पालवे, रतन कासार, आबा माने आदि  उपस्थित होते.


     श्री.पाउलबुधे पुढे म्हणाले, नागरिकांशी संपर्कात राहून समन्वयामुळे प्रभागात आम्हा सर्व नगरसेवकांना विकास कामे करताना अडचण येत नाही. नागरिकांच्या मुख्य प्रश्नांबरोबरच परिसरातील  ओपनस्पेसमध्ये सुशोभिकरण, मंदिरांसमोर सभा मंडपाची कामे झाल्याने समाधान वाटते.


     माजी नगरसेवक निखिल वारे म्हणाले, प्रभागात विकास कामे करताना आम्ही पाठपुरावा करुन, योग्य ते प्रयत्नांमुळे खा.सुजय विखे, आ.संग्राम जगताप यांच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन कामे केली. येत्या 6 महिन्यात, लक्ष्मीनगर, निर्मलनगर परिसरात रस्ते कॉक्रीटीकरण, डांबरीकरणाची होतील.


     नगरसेवक सुनिल त्र्यंबके, बाळासाहेब पवार यांनीही मनोगते व्यक्त केली. नागरिकांनी चारही नगरसेवकांच्या कामांबात समाधान व्यक्त केले. काम करणारे नगरसेवक आम्ही निवडून दिले, त्यांच्या पाठिशी सदैव आम्ही राहू, असे सागर पालवे यांनी सांगितले.


     यावेळी चंद्रकांत ढाकणे यांच्या हस्ते नगरसेवकांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कैलास गर्जे, ओंकार टाक, अशोक अनफट, पप्पू सगळगिळे, कैलास तोडकर, गणेश काटकर, रमजान शेख, 


चंद्रकांत ढाकणे, योगेश कुलकर्णी, संदिप भोसले, तोफिक पठाण, रविराज गर्जे, श्रीकांत खताडे, अनिल शिंदे, रवि भिंगारदिवे, सचिन सानप, कुलदिप भिंगारदिवे, स्वाती कासार, छाया नवले, सारिका वारु, विमल तोडकर, सुवर्णा फुंदे, हिराबाई गीते, सुनिता गवते, श्वेता गर्जे आदिसह नागरिक उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा (0)