Header Ads

Ward No 6: समस्यामुक्त प्रभाग करण्याचा आपला प्रयत्न - नगरसेविका वंदना ताठे

 Ward No 6: प्रभाग क्रमांक सहा मध्ये शिंदे मळा येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

Ward No 6: प्रभाग क्रमांक सहा मध्ये शिंदे मळा येथील रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ    Ward No 6: अहमदनगर (प्रतिनिधी)  -  प्रभागातील प्रत्येक नागरिकांना मुलभुत सुविधा पुरविल्या गेल्या पाहिजे, याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यास प्राधान्य दिले गेले, नागरिकांचेही विकास कामांसाठी सहकार्य मिळत असल्याने प्रभागात चांगली विकास कामे होत आहेत. 


प्रत्येक भागातील ड्रेनेज, पाणी, रस्ते, स्ट्रीट लाईट अशी कामे प्राधान्याने पुर्ण करण्यात येत आहेत. मनपाच्या विविध योजना, खासदार डॉ.सुजय विखे यांच्या माध्यमातूनही निधी उपलब्ध करुन प्रभागात विकास कामे केली आहे. शिंदे मळा परिसरातील रस्त्यांचे कॉक्रीटीकरण होत असल्याने नागरिकांची चांगली सोय होणार आहे. समस्यामुक्त प्रभाग करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रतिपादन नगरसेविका सौ.वंदनाताई ताठे यांनी केले.


     नगरसेविका वंदनाताई ताठे यांच्या प्रयत्नांतून प्रभाग क्रमांक 6 मधील शिंदे मळा परिसरात रस्ता काँक्रिटकरण कामाचा शुभारंभ माजी महापौर बाबासाहेब वाकळे व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला. 


यावेळी नगरसेविका वंदना ताठे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, विलास ताठे, अरुण शिंदे, राम शिंदे, प्रशांत शिंदे, विक्रम शिंदे, गिरीश शिंदे, मुकुंद पेहेरे, विकी सामले, वैभव माहेर, ऋषिकेश शिंदे, सोनाली शिंदे, वंदना जाधव, अंजली पेहेरे, चंद्रकला शिंदे, मीरा जाधव, अलका मोरे, संगीता जाधव, उषा वडे, निर्मला शिंदे, मयुरी शिंदे, शांताबाई शिंदे, विद्या साबळे, किर्ती लगड, स्वाती साबळे, शोभा साबळे व परिसरातील  नागरिक उपस्थित होते.


     याप्रसंगी माजी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले, सावेडी  प्रभाग क्रमांक सहा मधील कर्तव्यदक्ष नगरसेविका वंदना ताठे या प्रभागातील नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यासाठी कायम तत्पर असतात. त्यामुळे प्रभागातील अनेक कामे मार्गी लागली आहेत. नागरिकांनी सर्व प्रकारच्या सुविधा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध असून, मागील काळात महापौर असतांना विविध योजनांच्या माध्यमातून प्रभागातील कामे मंजुर करुन ती पुर्ण केली, त्याचबरोबरच अमृत योजनेचे कामही पुर्ण झाल्याने शहरातील मुलभुत सुविधा नागरिकांना मिळत आहेत, असेही त्यांनी सांगितले.


     यावेळी रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी नगरसेविका वंदना ताठे यांचे आभार मानले असून त्या नेहमीच परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असतात अशी भावना देखील नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.


     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत शिंदे यांनी केले तर विक्रम शिंदे यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.