Header Ads

Ahmednagar Congress: काँग्रेसचे मनपा कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू ; व्यापाऱ्यांना केले "असे" आवाहन

 व्यापाऱ्यांना बाजारपेठ दुकाने बंद न ठेवण्याचे काँग्रेसचे आवाहन 

Ahmednagar Congress: काँग्रेसचे मनपा कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू ;  व्यापाऱ्यांना केले "असे" आवाहन



 Ahmednagar Congress:  अहमदनगर (प्रतिनिधी)  : बाजारपेठेत विविध व्यापारी संघटनांच्या संयुक्त बैठकीत जाहीर केल्याप्रमाणे २०० ते १५ हजार रुपयांपर्यंतचा मनापा कडून आकारण्यात येणारा जाचक व्यावसाय परवाना शुल्क वसुलीचा निर्णय रद्द करण्यात यावा या मागणी करिता काँग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहरातील सुमारे ४० हजार व्यावसायिकांसाठी मनपा कार्यालया समोर दोन दिवसीय धरणे आंदोलन सुरू केले आहे.


 शहरातील व्यापारी, दुकानदारांचा आक्रोश मनपा आयुक्त, नगरसेवक, मनपा पदाधिकारी, आमदार, खासदार यांच्यापर्यंत काँग्रेस पोहोचविणार असल्याचे यावेळी बोलताना काळे म्हणाले. सोमवारी सकाळी काळे यांनी निवडक सहकाऱ्यांसमवेत चितळे रोड येथील शिवालयात जाऊन स्व. अनिलभैय्या राठोड यांना अभिवादन करून धरणे आंदोलनाला सुरुवात केली.  


आंदोलनाला सुरुवात करताना किरण काळे म्हणाले, आधीच कोणत्याही कारणावरून बाजारपेठ बंदची हाक वारंवार दिली जाते. समाज माध्यमांवर तसे संदेश फिरतात. यामुळे ग्राहक बाजारपेठेकडे फिरकत नाहीत. व्यवसायिकांचे नुकसान होते. त्यामुळे धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी बाजारपेठ, दुकाने बंद न ठेवू नयेत. आपला धंदा बंद ठेवून स्वतःचे नुकसान करून घेऊ नये.

 आंदोलनस्थळी व्यापाऱ्यांनी गर्दी करू नये. त्यांनी आपले व्यावसायिक नुकसान न करता आपला व्यवसाय सुरू ठेवत आंदोलनातील सहभाग कायम ठेवावा, असे जाहीर आवाहन काळे यांनी केले आहे. शहरातील व्यावसायिकांच्या धंद्यावर सततचे बंद आणि कोरोना काळानंतर झालेला विपरीत परिणाम पाहता इथून पुढील काळात शहरात बाजारपेठ बंदला काँग्रेसचा विरोध असल्याचे काळे यावेळी स्पष्ट केले.


शनिवारी रात्री बाजारपेठेतील सप्तक सदन बँक्वेट हॉल येथे शहरातील विविध व्यावसायिक व्यापारी संघटना, असोसिएशनची प्रथमच संयुक्त बैठक पार पडली होती. यावेळी सर्व संघटनांच्या प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होती. या बैठकीतच शहर काँग्रेसने किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे निर्णय आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले होते. बैठकीला काळे यांच्यासह एमजी रोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शामराव देडगावकर, सचिव किरण व्होरा, केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता गाडळकर, राजेंद्र बलदोटा, 


अहमदनगर होलसेल कापड असोसिएशनचे सचिव राजेंद्र गांधी, सचिन चोपडा, इलेक्ट्रिकल डिस्ट्रीब्यूटर असोसिएशनचे वसंत शहा, मनोहर शहाणे, उमेश रेखे, ऑप्टिकल्स असोसिएशनचे सागर मुळे, नयन आडकर, फुटवेअर असोसिएशनचे नेमीचंद गोयल, होलसेल मेडिकल असोसिएशनचे अशोक बलदोटा, सराफ बाजार असोसिएशनचे पांडुरंग दहिवाळ, सुभाष कायगावकर, वैजनाथ चिंतामणी, मोहन देवळालीकर, 

शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, काँग्रेसचे माजी नगरसेवक संजय झिंजे, माथाडी काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरीवाला, मोची गल्ली मित्र मंडळाचे अध्यक्ष अनिस चुडीवाला, मर्चंट बँक संचालक संजय चोपडा, 

क्रीडा व युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश अल्हाट, युवक उपाध्यक्ष आनंद जवंजाळ, नंदलाल दोडगे, धीरज मुनोत, राहुल मुथा, पेमराज पोखरण, पंडित मिसाळ, रवी वाळवेकर, सुरेश गांधी, किशोर ताथेड, सतीश मुथा, विशाल वैद्य, आनंद नहाटा, विजय मुनोत, लक्ष्मीकांत तिवारी आदींसह व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावेडी, केडगाव उपनगरातील दुकानदार देखील सहभागी झाले होते. 


काळे म्हणाले, मनपाला शहरातील व्यावसायिक म्हणजे सोन्याची कोंबडी वाटतात. शासन शॉप ॲक्ट लायसन शुल्क गेल्या अनेक वर्षांपासून घेत आहे. व्यावसायीक ते भरतात. मग ते दिल्यानंतर पुन्हा त्याच कारणासाठी व्यावसायिक परवा शुल्क का म्हणून त्यांनी द्यायचे ? मनपा महासभेत नगरसेवकांनी आवाज उठवायला हवा होता. त्यावेळी ते शांत बसले. मात्र आता काही लोक पत्रकबाजी करुन अकलेचे तारे तोडत आहेत. हेच त्यांनी सभागृहात हा जाचक निर्णय होत असताना त्याला विरोध दर्शवला असता तर त्याचे स्वागत केले असते. त्यामुळे व्यापाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी काही लोक सुपारी घेऊन काम करीत आहेत. व्यापाऱ्यांचे यामुळे नुकसान करण्याचा डाव काही लोकांचा आहे.  


दिवंगत शिवसेना नेते अनिलभैय्या राठोड यांचा व्यापाऱ्यांना मोठा आधार वाटायचा. मात्र दुर्दैवाने आज ते हयात नाहीत. ते नसले तरी त्यांचा वारसा, विचार डोळ्यासमोर ठेवून शहरात काँग्रेस पक्ष व्यापारी, दुकानदारांच्या पाठीशी भक्कमपणाने उभी आहे. व्यापाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याची काँग्रेसची तयारी आहे, असे यावेळी काळे म्हणाले. 


यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, माजी नगरसेवक तथा ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष तथा मोची गल्ली व्यापारी मित्र मंडळाचे अध्यक्ष अनिस चुडीवाला, माजी नगरसेवक फैय्याज शेख, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, उपाध्यक्ष सुनीताताई भाकरे, माथाडी काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे, मागासवर्गीय काँग्रेस विभागाचे सुनील क्षेत्रे, 

शहर जिल्हाध्यक्ष सुनील भिंगारदिवे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहराध्यक्ष चंद्रकांत उजागरे, युवक व क्रीडा काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष आकाश अल्हाट, उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, शहर जिल्हा उपाध्यक्ष अल्तमश जरीवाला, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, आनंद जवंजाळ, इंजिनिअर सुजित क्षेत्रे, केडगाव काँग्रेसचे किशोर कोतकर,

 अपंग काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सोफियान रंगरेज, साफसफाई कामगार विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष गणेश चव्हाण, विजय चौथे, रियाज सय्यद, अजय रणसिंग, दर्शन अल्हाट, 


राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आरिफ शेख, बिभीशन चव्हाण, समीर शेख, युवक सरचिटणीस गौरव घोरपडे, काँग्रेस ग्रंथालय विभाग शहर जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब लांडगे, अल्पसंख्यांक शहर जिल्हा उपाध्यक्ष मुस्तफा शेख, अमोल गायकवाड आदींसह काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.