Satkar: 3 लाख नागरिकांवर मोफत शस्त्रक्रिया घडवून आणल्याबद्दल नेत्रदूत बोरुडे यांचा गौरव

Darshak
0


  Satkar: आमदार संग्राम जगताप व आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते गौरव  

Satkar:आमदार संग्राम जगताप व आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते गौरव Satkar: अहमदनगर (प्रतिनिधी)- नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांनी विविध माध्यमातून मोफत नेत्रतपासणी शिबिर घेऊन समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील 3 लाख 1 हजार 111 नागरिकांवर विक्रमी मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणल्याबद्दल त्यांचा श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आमदार संग्राम जगताप व आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.


केडगाव येथे झालेल्या मोफत नेत्रतपासणी शिबिराच्या कार्यक्रमात बोरुडे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, प्रीतपालसिंह धुप्पड, जनक आहुजा, बुधराणी हॉस्पिटलचे प्रकाश धर्माधिकारी, उद्योजक रवींद्र बक्षी, अनिश आहुजा, जतीन आहुजा, कैलाश नवलानी, नेत्रदूत जालिंदर बोरुडे, सुनिल थोरात, जय रंगलानी आदी उपस्थित होते.

श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टने घेतली कार्याची दखल

सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी गेल्या 31 वर्षापासून फिनिक्स सोशल फाऊंडेशन व इतर सामाजिक संघटनांच्या माध्यमातून शिबिर घेऊन हजारो गोरगरीब नेत्रदोष असलेल्या रुग्णांना मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणल्या आहेत. 

नुकतेच गरजू नागरिकांवर मोतिबिंदू शस्त्रक्रियेचा विक्रमी 3 लाख 1 हजार 111 चा टप्पा पार झाला आहे. या सेवेच्या माध्यमातून त्यांनी दृष्टी दोष असलेल्यांना नवीन दृष्टी देण्याचे सेवा कार्य केले आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला.


आमदार संग्राम जगताप व आमदार अरुण जगताप यांनी निस्वार्थ भावनेतून जालिंदर बोरुडे यांच्या सेवाकार्याने अनेक गरजूंना नवदृष्टी मिळाल्याचे सांगून, या कार्याचे कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at darshaknews81@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा (0)