Header Ads

Ahmednagar Church: अहमदनगर पहिली मंडळीच्यावतीने आनंद मेळाव्याने ख्रिस्तजन्मोत्सवाची सांगता

 Ahmednagar Church: अहमदनगर पहिली मंडळीच्यावतीने आनंद मेळाव्याने ख्रिस्तजन्मोत्सवाची सांगता

Ahmednagar Church: अहमदनगर पहिली मंडळीच्यावतीने आनंद मेळाव्याने ख्रिस्तजन्मोत्सवाची सांगता    अहमदनगर (प्रतिनिधी)- ख्रिस्त जन्मोत्सव हा सर्व जगभर मोठ्या आनंदाने साजरा करण्यात येत असतो. या आनंदी क्षणी सर्वांनी एकत्रित येऊन विचारांची देवाण-घेवाण केली पाहिजे. आजच्या आनंद मेळाव्याच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र येऊन विविध उपक्रमात सहभागी होत हा उत्सव आनंदाने साजरा केला आहे. 


अशा उपक्रमातून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होत असतो. यामुळे येणारा काळात आपण अडचणीवर मात कराल. मेळाव्यातून जो आनंद सर्वांना मिळाला आहे, तो वर्षभर पुरणारा आहे. हे नवीन वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण करेल,  अशी शुभकामना रेव्ह.अभिजित तुपसुंदरे यांनी व्यक्त केली.


     अहमदनगर पहिली मंडळी नाशिक धर्मप्रांत  (सी.एन.आय.)च्यावतीने ख्रिस्तजन्मोत्सव 2023 निमित्त आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याप्रसंगी रेव्ह. अभिजित तुपसुंदरे आदिंसह सर्व कमिटीचे मेंबर्स, तरुण संघ, महिला मंडळ, संडे स्कूलचे शिक्षक, विद्यार्थी सर्व सन्मानिय सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.


     प्रारंभी नववर्षाच्या सुरुवातीला रेव्ह.अभिजित तुपसुंदरे यांनी उपासनेने सुरुवात करुन नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. या आनंद मेळाव्यात लहान मुलांसाठी रनिंग, फुगे फोडणे, लिंबू चमचा तर महिलांसाठी संगित खुर्ची, स्लो मोपेड, कपल्ससाठी सुई-दोरा ओवणे, पुरुषांसाठीही अशाच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 


उपस्थितांसाठी विविध प्रकारच्या खाद्यांचे स्टॉल लावण्यात आले होते, त्यांचा आनंद सर्वांनी लुटला.यावेळी केक कापण्यात येऊन  फटकांची आतिष बाजी करण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.