Header Ads

Ahmednagar MSEB: मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद देशाच्या भविष्यासाठी फलदायी -इंजि.किरण शिंपीAhmednagar MSEB: महाराष्ट्र राज्य महा पारेषण कंपनीच्यावतीने मतदार दिनानिमित्त विविध उपक्रम

Ahmednagar MSEB: महाराष्ट्र राज्य महा पारेषण कंपनीच्यावतीने मतदार दिनानिमित्त विविध उपक्रम
     


अहमदनगर (प्रतिनिधी)  - अहमदनगर महाराष्ट्र राज्य पारेषण कंपनी संरक्षण स्वयंचलन तसेच दूरसंचार विभाग अहमदनगर येथे भारत निवडणूक आयोगाच्या स्थापना दिवस ‘राष्ट्रीय मतदान दिवस’ विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे. यावेळी कार्यकारी अभियंता  किरण शिंपी, उपकार्यकारी अभियंता शशांक देशमुख, योगेश बैसाणे, श्रीपाद मुळे, मुनिश्वर मेश्राम, वैभव बर्वे, कविता गायके, ऋषीकेश तांबे, प्रदीप खोत्रे, आशिष वेळापुरे, विश्वास कदम, बाबा भिंगारदिवे


     यावेळी किरण शिंपी म्हणाले, 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. 25 जानेवारी स्थापना दिवस म्हणून संपूर्ण देशभरात राष्ट्रीय मतदान दिन म्हणून साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा मतदारांना, विशेषत: नव मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन देणे, सुलभरीत्या त्यांची नावे नोंदणी करून घेणे, निवडणूक प्रक्रियेत सहभाग वाढवावा म्हणून त्यांना जागरूक करण्यासाठी या उद्देशाने राष्ट्रीय मतदान दिन  आज या ठिकाणी साजरा करण्यात आला आहे. यानिमित्त राबविण्यात आलेल्या उपक्रमास मिळालेला उत्स्फुर्त प्रतिसाद देशाच्या भविष्यासाठी फलदायी आहे, असे सांगितले.


     यावेळी विभागातर्फे रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, घोषवाक्य, रिल स्पर्धा, वकृत्व स्पर्धा आयोजन करण्यात आले होते


     या स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे (अनुक्रमे) रांगोळी स्पर्धा - सौ कविता गायके, सौ. स्वरा वेळापुरे, सौ. श्रद्धा कदम. चित्रकला स्पर्धा - शरण्या वेळापूरे, अनन्या भिंगारदिवे, रेणुका झांजे. पोस्टर स्पर्धा -विश्वास कदम, निलेश दळवी, आशिष भिंगारदिवे. घोषवाक्य - प्रदीप खोत्रे, ऋषिकेश तांबे, वैभव  बर्वे. रिल स्पर्धा - रोहित निकाळे, मुनेश्वर मेश्राम, श्रीपाद मुळे. वकृत्व स्पर्धा - विशाल कळमकर, बाबा भिंगारदिवे. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आली.


      विभागातील सर्व कर्मचार्‍यांना  मतदानाची  प्रतिज्ञा देण्यात आली.  कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपकार्यकारी अभियंता शशांक देशमुख आदिंसह कर्मचार्‍यांरी परिश्रम घेतले. आभार आशिष वेळापुरे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.