Header Ads

Ahmednagar Music: गीत-संगीत मनोरंजना बरोबरच औषधासारखे आहे - अ‍ॅड.ललित गुंदेचा


Ahmednagar Music: मोहंमद रफी जन्म शताब्दी वर्षानिमित्त गजल-गीतांची मौफिल संपन्न


Ahmednagar Music: अहमदनगर (प्रतिनिधी)  - जीवन जगताना जसा श्वास आवश्यक असतो, त्याप्रमाणेच संगीत हा देखील आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक भाग आहे ‘संगीत’. हे सुरांचे व सुसंवादाचे मिलन आहे. यामध्ये एखाद्याला खूपच समाधान मिळते तर कोणाला आनंद होतो. जीवनातील नैराशावर मात करण्यासाठी गीत-संगीत हे मनोरंजनाबरोबर औषधासारखे आहे, असे प्रतिपादन नगर येथील प्रसिद्ध विधितज्ञ अ‍ॅड.ललित गुंदेचा यांनी केले.


    

Ahmednagar Music: अहमदनगर (प्रतिनिधी)  - जीवन जगताना जसा श्वास आवश्यक असतो, त्याप्रमाणेच संगीत हा देखील आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक भाग आहे ‘संगीत’. हे सुरांचे व सुसंवादाचे मिलन आहे. यामध्ये एखाद्याला खूपच समाधान मिळते तर कोणाला आनंद होतो. जीवनातील नैराशावर मात करण्यासाठी गीत-संगीत हे मनोरंजनाबरोबर औषधासारखे आहे, असे प्रतिपादन नगर येथील प्रसिद्ध विधितज्ञ अ‍ॅड.ललित गुंदेचा यांनी केले.


     मखदुम एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटी व रहमत सुलतान फाऊंडेशनच्यावतीने महान गायक मोहंमद रफी  यांच्या 100 व्या जयंती शताब्दी वर्षानिमित्त ‘रफी के रंग... गीत गजल के संग..’ या रफींच्या गीतांची मैफिल आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन अ‍ॅड.ललित गुंदेचा यांच्या हस्ते झाले.


 याप्रसंगी जागरुक नागरीक मंचचे अध्यक्ष सुहास मुळे, उद्योगपती धनेष बोगावत, उद्योगपती अमृत मुथा, मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष इंजि.अभिजित वाघ, रहेमत सुलतान फौंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर, मखदूम सोसायटीच्या सचिव डॉ.कमर सुरुर, गाता रहे मंरा दिल ग्रुपचे अध्यक्ष अ‍ॅड.अमिन धाराणी, संध्याताई मेढे, मालेगावचे इरशाद अंजुम, जीवन फौंडेशनचे आरिफ सय्यद आदि मान्यवर उपस्थित होते.


     या मैफिलमध्ये मोहंमद रफी यांची सदाबहार गीते अ‍ॅड.अमिन धाराणी, सुनिल भंडारी, दिनेश मंजरतकर, इकबाल बागवान, अ‍ॅड.गुलशन धाराणी, प्रशांत छजलानी, अन्वर शेख, डॉ.विवेकानंद कंगे, डॉ.अविनाश मंचरकर, राजेंद्र शहाणे, महेश घावटे, जावेद मास्टर, डॉ.रेश्मा चेडे, विद्या तन्वर, सईद खान यांनी सादर केली. तर मोहंमद रफी यांच्यावर कवयत्री डॉ.कमर सुरुर यांनी कविता सादर केली. हास्य कवी बिलाल अहमदनगरी यांना रसिकांना आपल्या हास्य रचनांनी लोळपोळ केले.


     अ‍ॅड.गुंदेचा पुढे म्हणाले, संगीतामध्ये चिंता, नैराश्य, निद्रानाश आदि रोग बरे करण्याचे सामर्थ्य आहे. एकाग्रता सुधारण्यासाठी मदत होते. संगीत जीवनात आवश्यक आहे. प्रवासात वेगळाच आनंद संगित देऊन जाते. लहान मुले सोशल मिडियामुळे संवाद विसरत चालली आहेत, मोबाईलमुळे बालपण हरवून मुले मानसिक रुग्ण होत आहे. गीत-संगीताच्या माध्यमातून आयोजकांनी वेगळे व्यासपीठ मुलांना निर्माण करावे. गीत-संगीताची गोडी मुलांना लागेल आणि ताणतणावामधून मुले बाहेर पडतील, असे ते म्हणाले.


     प्रास्तविकात आबीद दुलेखान यांनी मोहंमद रफी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त वर्षीर गीत-संगाचे विविध मैफिल व उपक्रमांचे आयोजनाबद्दल माहिती दिली. कार्यक्रमास के.के.खान, युनूस तांबटकर, आरिफ सय्यद, इंजि.इकबाल सय्यद, दिनेश मंजरतकर, अमिन धाराणी, शफकत सय्यद  यांचे सहकार्य लाभले.


     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इरशाद अंजुम यांनी केले तर आभार मुस्कान फौंडेशनचे शफकत सय्यद यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.