Header Ads

Ahmednagar Runners: टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत अहमदनगर रनर्स क्लबची लक्षवेधी कामगिरी

 Ahmednagar Runners: टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत अहमदनगर रनर्स क्लबची लक्षवेधी कामगिरी

Ahmednagar Runners: टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेत अहमदनगर रनर्स क्लबची लक्षवेधी कामगिरी


    अहमदनगर (प्रतिनिधी)  - जगभरात प्रतिष्ठेची समजली जाणारी ‘टाटा मुंबई मॅरेथॉन 2024’ ही स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. हर दिल मुंबईचा नारा देत हजारो मुंबईकर आणि जगभरातील धावपटू सहभागी झाले होते. या मॅरेथॉनमध्ये अहमदनगर रनर्स क्लबने लक्षवेधी कामगिरी केली. एकूण 30 जण सहभागी झाले होते.


     मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखविला. या स्पर्धेत 59 हजार रनर्स या मॅरेथॉनमध्ये धावले.


     अहमदनगर रनर्स क्लबचे 19 धावपटू 42 कि.मी. साठी तर 11 धावपटू 21 कि.मी. करीता धावले. यामध्ये विलास भोजने, संजय शेळके, वैभव वाघ, प्रसाद तनपुरे, उदय गरकर, जगदीप मकर, गौतम जायभाय, सुयश बुरा, डॉ.शाम तारडे, योगेश खरपुडे, अंबादास हुलगे, हरिष काबरा, पुरुषोत्तम बुरा, आशिष येरेकर, ऋषिकेश हरवणे, अतुल शेटीया, श्रेयांश कांकरिया, डॉ. निलम पंडित, स्मिता उकिर्डे यांनी 42 कि.मी.मॅरेथॉन पुर्ण केली.


     हाफ मॅरेथॉन 21 कि.मी. मध्ये महेश मुळे, दिनेश संकलेचा, गणेश पाटील, आनंद फिरोदिया, अमृत पितळे, भुषण मालू, प्रदीप चोभे, गौरव बोथरा, पुष्कर बुरा, विक्रांत मोरे, जयलक्ष्मी बुरा आदि सहभागी झाले होते. सर्व 30 धावपटूंनी चांगली कामगिरी या स्पर्धेत दाखवून रनर्स क्लबचे नाव स्पर्धेत उंचावले.


     या स्पर्धेत जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी रनर्स क्लबच्या माध्यमातून चांगला सराव केला. त्यांची दखल घेत क्लबसह श्री.येरेकर यांचे कौतुक होत आहे. प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे, यांचे हस्ते माझा सन्मान करण्यात आला. हा आमच्या सर्व रनर्स क्लबचा सन्मान आहे, असे येरेकर यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.