Header Ads

Ambika Bank: सावित्रीबाई फुले यांच्या क्रांतिकारी विचारांचा आदर्श आजच्या तरुणाईने समोर ठेवावा- प्रा मेधाताई काळे

 Ambika Bank:  जिल्हा मराठा पतसंस्था व जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

Ambika Bank:  जिल्हा मराठा पतसंस्था व जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन    Ambika Bank:  अहमदनगर (प्रतिनिधी) -  सावित्रीबाई फुले यांनी ज्या काळात बहुजनाने शिक्षण घेणे यावर बंदी होती, त्यावर समाजाचा रोष पत्करून महिलांना शिकवण्याचा, त्यांना मुक्त करण्याचा जो वसा घेतला होता, त्याचा क्रांतीकारी विचारांचा  आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या महिलांनी आणि युवतींनी त्यांचा विचार पुढे नेला पाहिजे, असे प्रतिपादन अंबिका महिला बँकेच्या संस्थापिका ज्येष्ठ विचारवंत प्रा. मेधाताई काळे यांनी केले.


     अहमदनगर जिल्हा मराठा पतसंस्था व मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या संयुक्त विद्यमाने मराठा पतसंस्थेच्या मार्केट यार्ड शाखेत स्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. 


याप्रसंगी प्रा.मेधाताई काळे, पतसंस्थेच्या संचालिका डॉ. कल्पना ठुबे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संपूर्णा सावंत, प्रदेश सहसंघटक कल्पना ठुबे, शहराध्यक्ष सुरेखाताई कडूस, सचिव वंदनाताई निघुट, जिल्हा सहसंघटक शांताताई ठुबे,  प्रसिध्दी प्रमुख अ‍ॅड. अनुराधाताई येवले, सदस्य श्रध्दाताई जपकर आदि उपस्थित होत्या.


     प्रा.काळे पुढे म्हणाल्या की, जर सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यावेळच्या समाजाला घाबरून ही चळवळ उभी केली नसती तर कदाचित आज खेड्यापर्यंत शिक्षणाची चळवळ गेली नसती, मुली घराच्या बाहेर पडल्या नसत्या. 


आज त्यांचे अनंत उपकार समाजावर आहेत आजच्या पिढीने त्यांचे विचार पुढच्या पिढीसाठी पुढे नेला पाहिजे तरच त्यांच्या त्यागाचे सार्थक होईल. समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रातील या क्रांतिकारी महिलांचे बहुमोल योगदान आहे.


     यावेळी संपुर्णाताई सावंत म्हणाल्या, सावित्रीबाई फुले जयंती ते राजमाता जिजाऊ जयंती 3 जानेवारी ते 12 जानेवारी 2024 या कालावधीत महाराष्ट्रातील विचारवंत, नामवंत महिलांचे सोशल मिडियाच्या माध्यमातून  व्याख्यान आयोजित केले, असून झूम व यूट्यूब द्वारे त्याचा लाभ सर्व महिलांनी घ्यावा, असे आवाहन केले.


      परिचय डॉ. कल्पना ठुबे यांनी करून दिला. सूत्रसंचालन अ‍ॅड. अनुराधा येवले यांनी केले तर आभार प्राचार्य कल्पना ठुबे यांनी मानले.


     यावेळी मराठा पतसंस्थेचे उपाध्यक्ष पत्रकार किशोर मरकड, संचालक ज्ञानदेव पांडुळे, बाळासाहेब काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक वारकड, शाखाधिकारी अनुपमा भापकर, पुष्पा इंगळे, कविता ढोणे, प्रशांत बोरुडे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.