Header Ads

Athare Patil School: आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये फनलॅन्ड कार्निवलची धुम

 Athare Patil School: आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये फनलॅन्ड कार्निवलची धुम

Athare Patil School: आठरे पाटील पब्लिक स्कूलमध्ये फनलॅन्ड कार्निवलची धुम                   अहमदनगर (प्रतिनिधी) -शहराच्या सावेडी विभागातील आठरे पाटील पब्लिक स्कूल या वसतिगृहात्मक इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या 25 एकराच्या विस्तीर्ण प्रांगणात फनलॅन्ड कार्निवल कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून  शनिवार  व रविवार या दोन दिवशी सकाळी 10 ते रात्री १०  वाजेपर्यंत त्याची वेळ आहे.


              या कार्यक्रमाचे उद्‌घाटन प्रसिध्द्ध उदयोगपती रवी बक्षी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी  चंद्रभान आठरे पाटील ग्राम नवोदय ट्रस्टचे  अध्यक्ष डॉ. अनिल आठरे पाटीलविश्वस्त डॉ. अंजली आठरे पाटील,  डॉ. आदिती आठरे पाटील,  मानसिंग आठरे पाटील व  संजय आठरे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


             रवी बक्षी यावेळी बोलताना म्हणाले  विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकासव्यवहार ज्ञानसंभाषण चातुर्य विकसित करण्याबरोबरच त्यांना आर्थिक देवाण-घेवाण शिकण्यासाठी फनलैंड कार्निवल कार्यक्रम उपयुक्त ठरेल असे कार्यक्रम विविध ठिकाणी होणे गरजेचे आहे आपण आता महानगरात राहतो ,पुणेमुबई येथे होणारे असे कार्यक्रम नगरमध्ये पण झाले पाहिजे असेही ते म्हणाले.

 

               या कार्यक्रमामध्ये नृत्यसंगीतअश्वरोहनजलतरणबलून शुटिंगट्रॅम्पोलिनआर्चरी. वॉटर झॉरबिंगबंजी जंम्पिंगअॅन्ग्री बर्डक्षिल ऑफ फॉर्च्यूनबोट रेसिंगबॉल इन क्लाऊनडिस्क ड्रॉपअंडर ओव्हर लकी सेव्हन,


 मैजिक शोपपेट शोबॉल फायडिंगबंगी रनबुल राईडअरांऊड व वलर्डमेरी गो रांऊडडि.जे. कॉर्नरएलिमीनेटरपेंट बॉलबॉऊसिंग कॅस्टल या सारखे अनेक मनोरंजनात्मक खेळांचा आनंद घेण्याची सुवर्णसंधीतसेच फुल टू धमाल मस्ती शिवाय स्वादिस्ट व रुचकर व्हेज व नॉन व्हेज खाद्य पदार्थाचे स्टॉलहीनामांकित बाहय विक्रेत्यांकडून लावण्यात आलेले आहेतत्याचाही मनमुराद आनंद घेऊन नगर करांनी फुल टूधमाल मस्ती करण्यासाठी फनलॅन्ड कार्निव्हलला एकदा अवश्य भेट दयावीअसे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिल आठरे पाटील यांनी केले आहे.


              या कार्यक्रमासाठी सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका कु. स्नेहल वाघमारेव सौ. प्रीती क्षीरसागर यांनी केले. यावेळी पालकशिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.