Header Ads

Award: विक्रांत फाऊंडेशनचा ‘आदर्श माता पुरस्कार’ प्रा.सौ.शोभा देसाई यांना जाहीर

  Award: विक्रांत फाऊंडेशनचा ‘आदर्श माता पुरस्कार’ प्रा.सौ.शोभा देसाई यांना जाहीर

Award: विक्रांत फाऊंडेशनचा ‘आदर्श माता पुरस्कार’ प्रा.सौ.शोभा देसाई यांना जाहीर


      Award: अहमदनगर (प्रतिनिधी)  - येथील विक्रांत फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षी स्व.सौ.चंद्रकला दत्तात्रय मदने यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा ‘आदर्श माता पुरस्कार 2024’  नाशिक येथील प्रा.सौ.शोभा राजेंद्र देसाई यांना जाहीर झाला. नुकतीच विक्रांत फाऊंडेशनची सर्वसाधारण सभा अध्यक्ष विनायक मदने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. 


याप्रसंगी उपाध्यक्ष भाग्यश्री राऊत, सचिव मंगेश मंचरकर, बाळासाहेब मदने, ज्ञानेश्वर मदने, डॉ.संगीता मदने, प्रदीप राऊत, वन जाधव आदिंसह पत्रकार विठ्ठल लांडगे, नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष शांतराम राऊत, नंदकुमार मोरे, विकास मदने यांच्या उपस्थित पार पडली. या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा होऊन पुरस्काराची घोषणा करण्यात आली.


     प्रा.सौ.शोभा देसाई या स्वातंत्र्य सैनिक कै.रभाजी मदने यांच्या कन्या. त्यांचे प्राथमिक शिक्षक अ.नगरमध्ये इंग्रजी माध्यमातून झाले,  मुलींना स्वत:च्या पायावर उभे करणे, त्यांना चांगले शिक्षण देणे हा उदात्त हेतू त्यांनी त्यावेळेस ठेवला पण परिस्थितीमुळे लग्न लवकर झाले. 


याही परिस्थितीत सासरच्या लोकांनी त्यांना पुढे बी.एड्., कॉम्प्युटर करुन नाशिकमध्ये शैक्षणिक कार्यास सुरुवात केली. आज शोभा देसाई यांचे नाशिक शहरामध्ये शैक्षणिक, सामाजिक कार्य चांगल्याप्रकारे सुरु असून, त्यांनी घडविलेले विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये मोठ-मोठ्या पदावर कार्यरत आहेत.


     सौ.शोभा देसाई यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेत त्यांना ‘आदर्श माता पुरस्कार’ जाहीर करण्यात आली असून, पुरस्कार वितरण 6 जानेवारी 2024 रोजी नगरमध्ये छोटेखानी कार्यक्रमात होणार असल्याचे अध्यक्ष विनायक मदने यांनी सांगितले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.