Header Ads

Award: निलम परदेशी बेस्ट डिस्ट्रीक्ट ऑफिसर व बेस्ट पीआरओ पुरस्काराने सन्मानित

  Award: निलम परदेशी बेस्ट डिस्ट्रीक्ट ऑफिसर व बेस्ट पीआरओ पुरस्काराने सन्मानित

Award: निलम परदेशी बेस्ट डिस्ट्रीक्ट ऑफिसर व बेस्ट पीआरओ पुरस्काराने सन्मानित     अहमदनगर (प्रतिनिधी)  - ऑल इंडिया लिनेस क्लब मधील चर्तुभुजा मल्टीपल अंतर्गत एम.एच-3 गोदातरंग डिस्ट्रीक्ट यांचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा पुणे येथे संपन्न झाला. यात लिनेस क्लब ऑफ अहमदनगर राजमाताच्या माजी अध्यक्षा व डिस्ट्रिक्ट पीआरओ निलम राजेश परदेशी यांचा 2023 चा बेस्ट डिस्ट्रिक्ट ऑफिसर व बेस्ट पीआरओ पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच महिलांकरिता घेण्यात आलेल्या ऑनलाईन उपक्रमांबद्दलही विशेष गौरव करण्यात आला.


     यावेळी एम.एच-3 च्या गोदातरंगच्या डिस्ट्रीक्ट प्रेसिडेंट लि.नंदिनी गोखले, मुंबई विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ.शर्मिला वीरकर, माजी मल्टीपल अध्यक्षा लि.अंजली विसपुते, लि.डॉ.वर्षा झंवर आदि उपस्थित होते. पुणे, नगर, नाशिक, जळगांव, धुळे आदि जिल्ह्यातील लिनेस सदस्यांमधून लि.निलम परदेशी यांना हा पुरस्कार मिळाला आहे.


     निलम परदेशी यांनी डिस्ट्रिक्ट पीआरओ म्हणून समाजात लिनेसस बद्दल जनजागृती करुन नावलौकिक वाढविण्याकरीता विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले.


     माजी डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट लि.अलका डोंगरे, लि.इंदू सुर्यवंशी, लि.छाया रजपुत, लि.रजनी गोंदकर आदिंसह विविध क्षेत्रातून लि.निलम परदेशी यांचे अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.