Header Ads

Bara Balutedar: पदाच्या माध्यमातून संघटना वाढवून योगदान द्यावे - माऊली गायकवाड

 Bara Balutedar: समाजसेवेचे व्रत जोपासत पदाच्या माध्यमातून संघटना वाढवून योगदान द्यावे - माऊली गायकवाड

Bara Balutedar: पदाच्या माध्यमातून  संघटना वाढवून योगदान द्यावे - माऊली गायकवाड


Bara Balutedar: नवर्षाला बारा बलुतेदार महासंघाची जम्बो कार्यकारिणी जाहीर


     Bara Balutedar: अहमदनगर (प्रतिनिधी) - समाजाचे प्रश्न हे दोन-चार व्यक्ती एकत्र येऊन सुटत नाही. एकाच विचाराने प्रेरित होऊन, एकाच उद्देशाने लढणारे लोक एकत्र येऊन जो गट तयार होतो, त्या संघटनेच्या माध्यमातून अन्यायावर मात करता येते. आपल्यामुळे संघटना नाही तर आपण संघटनेमुळे आहोत ही जाणिव ठेवून समाजसेवेचे व्रत जोपासत, पदाच्या माध्यमातून संघटना वाढवून नवीन पदाधिकार्‍यांनी योगदान द्यावे. संघटनेचा नावलौकिक वाढवावा, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड यांनी केले.


     नववर्षाला बारा बलुतेदार महासंघाचे जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, कार्याध्यक्ष असे तालुकास्तरावर नव्याने संधी देण्यात आली. महिलांना स्थान देण्यात आले. सर्वांना नियुक्तीचे पत्र जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आली. यावेळी सर्वांनी प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून संघटनेनी दिलेली जबाबदारी यथाशक्ती पार पाडू, असा विश्वास जिल्हाध्यक्षांना दिला.


     पुढे बोलतांना माऊली गायकवाड म्हणाले, बारा बलुतेदार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात आपले काम चांगल्या प्रकारे सुरु आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर महासंघाचे काम मोठ्या प्रमाणावर होत आहे. नवीन नियुत्यांमुळे शाखा, संघटन वाढीस लागणार आहे. समाजाचे प्रश्न सुटण्यास मदत होत आहे. अशीच एकी ठेवून संघटनेत सर्वांनी झोकून देऊन काम करा, असे आवाहन श्री.गायकवाड यांनी केले.


     नियुक्तीपत्र प्रदान करतांना बारा बलुतेदार महासंघाचे उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.