Header Ads

अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या स्फुर्तीगीत स्पर्धेत रामकृष्ण स्कूल अव्वल

 प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रभक्तीचा दुमदुमला गजर

अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या स्फुर्तीगीत स्पर्धेत रामकृष्ण स्कूल अव्वल तर अभिवाचन स्पर्धेत सुरेखा घोलप अव्वल


अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या स्फुर्तीगीत स्पर्धेत रामकृष्ण स्कूल अव्वल     अहमदनगर (प्रतिनिधी) - भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त अहमदनगर जिल्हा वाचनालय आयोजित शालेय स्फुर्तीगीत स्पर्धेतून बालकांच्या मुखातून राष्ट्रभक्तीचा गजर दुमदुमला मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या स्पर्धेत दोन्ही गटात रामकृष्ण इंग्लिश मिडियम स्कूल,सारसनगरने अव्वल स्थान मिळवित प्रथम क्रमाकाचा विजेता करंडक पटकाविला. डॉ.एपीजी अब्दुल कलाम जयंती वाचन प्रेरणा दिनानिमित्त झालेल्या अभिवाचन स्पर्धेत सुरेखा घोलप यांनी प्रथम क्रमांक मिळविला.


     स्पर्धेचे पारितोषिक वितरण ग्रंथालय संचालनालय मुंबईचे प्रभारी संचालक अशोक गाडेकर व रोटरी इंटरनॅशनलचे माजी प्रांतपाल शिरिष रायते यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी संचालक किरण आगरवाल, उपाध्यक्ष दिलीप पांढरे, प्रा.मेधाताई काळे, स्पर्धा संयोजिका प्रा.ज्योती कुलकर्णी, शिल्पा रसाळ, स्पर्धेचे परिक्षक श्रीराम तांबोळी, संदिप भुसे, डॉ.शाम शिंदे, ग्रंथपाल अमोल इथापे उपस्थित होते.


     प्रा.संचालक अशोक गाडेकर यांनी बोलतांना ‘बालकांमध्ये देशप्रेम, सामाजिक भान, नेतृत्व गुण वृद्धीगत होण्यासाठी वाचनालयाच्या स्पर्धा प्रेरणादायी असल्याचे सांगितले.


     रो.शिरिष रायते यांनी स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने आपल्या गुणांत, रिसाझ च्या माध्यमातून प्रगती होण्यासाठी यशाचा मार्ग तयार होत असल्याचे सांगितले.


     यावेळी परिक्षकांनी सखोलपणे स्पर्धकांना मार्गदर्शन केले. मान्यवरांचा परिचय प्रा.ज्योती कुलकर्णी यांनी करुन दिला. स्वागत किरण आगरवाल यांनी तर सूत्रसंचालन शिल्पा रसाळ यांनी केले. विजेत्या संघातील प्रत्येक स्पर्धकांना पदक तसेच सांघिक करंड मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. स्पर्धा यशस्वीतेसाठी अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक, प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड, सर्व संचालक मंडळ, पल्लवी कुक्कडवाल, कुमार गुंटला, संजय गाडेकर, विठ्ठल शहापुरकर यांचे सहकार्य लाभले. 


स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे -

     राज्यस्तरीय अभिवाचन स्पर्धा प्रथम - सौ.सुरेखा घोलप, द्वितीय - माधव मनोहर जोशी (मुंबई), तृतीय - वर्षा अष्टेकर. स्फुर्तीगीत स्पर्धा गट क्र.1 : प्रथम - रामकृष्ण इंग्लिश मिडियम स्कूल, द्वितीय - ज्ञानसंपदा स्कूल तपोवन रोड, तृतीय - श्री समर्थ विद्या मंदिर (प्राथ.) सांगळेगल्ली, उत्तेजनार्थ - अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडियम स्कूल, बाई इचरजबाई फिरोदिया प्रशाला, समर्थ विद्या मंदिर प्रशाला सावेडी


     स्फुर्तीगीत स्पर्धा गट क्र.2 : प्रथम -रामकृष्ण इंग्लिश मिडियम स्कूल, द्वितीय - भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूल, तृतीय - समर्थ विद्या मंदिर सावेडी, उत्तेजनार्थ - अशोकभाऊ फिरोदिया स्कूल, समर्थ विद्या मंदिर सांगळेगल्ली, पार्वतीबाई डहाणुकर कन्या विद्यालय.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.