Header Ads

Chitale Road: प्रजासत्ताकमधून सर्वधर्म समभावाचे पालन-हाजी अन्वर खान

 चितळे रोड येथील मिरावली बाबा यंग सर्कल ट्रस्टच्यावतीने ध्वजारोहण


Chitale Road: प्रजासत्ताकमधून सर्वधर्म समभावाचे पालन-हाजी अन्वर खान
   Chitale Road:  अहमदनगर (प्रतिनिधी)  -  भारताने प्रजासत्तक गणराज्य म्हणून 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारले. तेव्हापासून भारतीय नागरिकांना  यामुळे अनेक अधिकार व कर्तव्य मिळाली. त्यातूनच भारतीय संविधानाने सर्वधर्म समभावाचे पालन करणे हे आपणासर्वाचे कर्तव्य आहे. या संविधानामुळेच सर्व धर्मिय आज आपल्या देशात गुण्या-गोविंदाने राहत आहेत. हीच एकता आपल्या देशाचे वैभव आणि ताकद आहे.


 प्रत्येकाने आपल्या देशाप्रती प्रेम व निष्ठा बाळगुन देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे प्रतिपादन भाजपाचे  अल्पसंख्याक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष हाजी अन्वर खान यांनी केले.

     26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त चितळे रोड येथील मिरावली बाबा यंग सर्कल ट्रस्टच्यावतीने ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी भाजपाचे अल्पसंख्याक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष हाजी अन्वर खान, सिंध किरणाचे श्री.सचदेव, पतितपावन संघाचे राम धोत्रे, लोकमान्य चहा भांडारचे निलेश भट, मौलाना रिजवान, एस.वाय.टेलरचे रोहन नल्ला, अन्वर प्रिंटरचे रऊफ खान, मिरावली बाबा यंग सर्कल ट्रस्टचे अध्यक्ष मुन्नाभाई, शाकिर सय्यद, नईम शेख, अनिस बाबा, हाजी आरिफ भाई, वसीम सय्यद, एजाज शेख, अल्तमश शेख, सलिम सय्यद आदि उपस्थित होते.


     यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष मुन्नाभाई म्हणाले,  ट्रस्टच्यावतीने राष्ट्रीय सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. तसेच सामाजिक सलोख्याचे उपक्रम राबविले जातात त्यास सर्वधर्मियांचा मोठा सहभाग असतो.


     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाकिर सय्यद यांनी केले तर नईम शेख यांनी आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.