Header Ads

Dr Paulbudhe College: पाऊलबुद्धे फार्मसीचे जेऊर बायजाबाई येथे श्रमसंस्कार शिबीर संपन्न


गावातील समस्यांचे निराकरण विद्यार्थ्यांच्या कौशल्यातून व्हावे
- प्राचार्य डॉ.निलेश जाधव


Dr Paulbudhe College: पाऊलबुद्धे फार्मसीचे जेऊर बायजाबाई येथे श्रमसंस्कार शिबीर संपन्न    अहमदनगर (प्रतिनिधी)   - विद्यार्थ्यांच्या सर्व गुणांचा विकास होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यान्वित आहे. विद्यार्थ्यांमध्ये लपलेले कला गुण कौशल्य यांचा शोध घेऊन योग्य मार्गदर्शन करून ते समाज उपयोगी कसे पडतील यासाठी प्रयत्न केला जातो. समाजसेवक करण्यासाठी विद्यार्थ्यांना यातून प्रोत्साहन दिले जाते. 


आपला देश हा कृषी प्रधान देश असल्याने ग्रामीण भागातील समस्या युवकांना ज्ञात होऊन, त्यांच्या कौशल्यातून या समस्यांचे निराकरण कसे होईल. यासाठी हे शिबीर ग्रामीण भागात आयोजित केले जाते. अंधश्रद्धा निर्मुलन, शिक्षणाचे महत्व, स्वच्छता, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांनी गावकर्‍यांना समजावून सांगत जागृती केली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनाही ग्रामीण जीवनाचा अनुभव मिळाला, असे प्रतिपादन डॉ.एन.जे. पाऊलबुद्धे फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.निलेश जाधव यांनी केले.


     वसंत टेकडी येथील पाऊलबुद्धे फार्मसी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनचे  जेऊर बायजाबाई येथे श्रमसंस्कार शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराच्या समारोपप्रसंगी प्राचार्या डॉ. रेखाराणी खुराणा, फार्मसीचे प्राचार्य डॉ.निलेश जाधव, प्राचार्य संदिप कांबळे, प्राचार्या अनुराधा चव्हाण, एनएसएसचे समन्वयक डॉ.विजय तारडे,सरपंच ज्योतीताई तोडमल,  उपसरपंच श्रीतेश पवार, सोसा.चेअरमन सोमनाथ तोडमल, बाळासाहेब मगर, अविनाश ससे, सुनिल शिंदे, अक्षय तोडमल, शरद तोडमल, हर्षल तोडमल, विजय आवारे आदि उपस्थित होते.


     सरपंच ज्योतीताई तोडमल म्हणाले, आज पाउलबुधे फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी गावात श्रमसंस्कार शिबीराच्या  माध्यमातून गावात श्रमदानाबरोबर सामाजिक जागृती करुन गावकर्‍यांना चांगली माहिती दिली. आजची युवा पिढी शहराकडे आकर्षित होत आहे, परंतु ग्रामीण भागातील  समस्यां जाणून त्या सोडविण्यासाठी या विद्यार्थ्यांचा पुढाकार कौतुकास्पद असाच आहे, असे सांगून पुढील शिबीरही पुन्हा आमच्यात गावात घ्यावे, अशी सूचना केली.


     या सात दिवशीय शिबिरांतर्गत पथ नाट्य-अंधश्रद्धा निर्मूलन जागृती, वृक्षारोपण, जलसंवर्धन विकास, शाळा, मंदिर, स्मशानभूमी, रस्ते गावाची स्वच्छता विद्यार्थ्यांनी केली. तसेच दैनंदिनीमध्ये प्रार्थना, व्यायाम, योगाभ्यास, श्रमदान, व्याख्यान, जनसंवाद, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम अशा उपक्रमात विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. आभार विद्यार्थी अनंत घुटे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.