Header Ads

Essay Competition: काजवा संस्था आयोजित राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

Essay Competition: काजवा संस्था आयोजित राज्यस्तरीय

निबंध लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर


Essay Competition: काजवा संस्था आयोजित राज्यस्तरीय  निबंध लेखन स्पर्धेचा निकाल जाहीर    Essay Competition: अहमदनगर (प्रतिनिधी)  - येथील काजवा बहुद्देशीय संस्था, अहमदनगर व बंडकरी मासिक यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या डिसेंबर 2023 मधील राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.


      खुल्या गटात प्रथम क्रमांक सुशीलकुमार मालवी (वाशिम), द्वितीय - किशोर वालावलकर (सिंधुदुर्ग), तृतीय - युवराज पाटील (कोल्हापूर), उत्तेजनार्थ - प्रशांत कुलकर्णी (नाशिक) आणि पर्यवेक्षकांनी  विशेष उत्तेजनार्थ म्हणून अश्विनी गावित यांच्या लेखाची निवड केली आहे.  तर लहान गटात प्रथम - दिपाली शिंदे (उस्मानाबाद), द्वितीय - ऐमन शेख (अहमदनगर), तृतीय - अमृता पास्ते (सिंधुदुर्ग) व उत्तेजनार्थ दुर्गेश चिलवर (जालना) यांना जाहीर झाले असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रविण धांडे यांनी दिली.


     स्पर्धेतील सहभागाबद्दल लेखक वर्ग आणि विद्यार्थ्यांचे मनापासून आभार. युवकांची लेखन शक्ती समाजाला आणि पर्यायाने निसर्ग आणि देशाला उज्वल भविष्य देण्यासाठी सक्षम असते. हे त्यांच्या विचारांमधून समजते, आपल्या लिखाणाच्या कलेने आणि विचारांनी भारावून टाकत सर्वांनी सर्व विषयांवर उत्तम लिखाण केले आहे. 


परंतु दोन गट आणि तीन बक्षिसे प्रमाणेच बक्षिसे द्यावे लागतील, त्यामुळे अनेकांना बक्षिसे देण्याचे वाटले तरी देता येत नाही. नियमाप्रमाणे प्रथम तीन क्रमांकांना पारितोषिके जाहीर केली आहेत. विजत्यांना बक्षिसे लवकरच सर्वांना पोस्टाने मिळतील असे संस्थेचे अध्यक्ष प्रविण धांडे यांनी कळविले आहे.


     विजेत्यांचे वनाधिकारी  शंकर लांडे, कवियत्री ज्योती भारती, इंजि. अभिजित वाघ,  विजया पाडेकर (आपले शिवार), योगेश कोंडार (मनसे, अकोले), काजवा क्लॉथ सेंटरचे प्रो. अविनाश कोंडार, राहुल वायळ, आदिवासी रत्न पुरस्कृत डॉ. दिपक चौधरी, कवी  संजय दोबाडे, तसेच संस्थेचे पदाधिकारी  सिताराम बांडे, सपना धांडे, अनुराधा कोकणी, रुपाली काळे, राम लोटे, रंजना देशमुख, निकिता घुगरकर, गौरी लांघे, श्रीराम लांडे आदींनी लेखकांना आणि विजेत्यांना शुभेछा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.