Header Ads

Fighter Movie: हृतिक आणि दीपिका स्टारर 'फायटर' रिलीज पहा ट्रेलर

 Fighter Movie: हृतिक आणि दीपिका स्टारर 'फायटर' रिलीज पहा ट्रेलर  

Fighter Movie: हृतिक आणि दीपिका स्टारर 'फायटर' रिलीज पहा ट्रेलर



मुंबई Fighter Movie : हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण स्टारर 'फायटर' हा आज 25 जानेवारी रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 2024चा पहिला ब्लॉकबस्टर ठरणार आहे. हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण अभिनीत 'फायटर'ची चाहते 


आतुरतेने वाट पाहत होते. अखेरीस हा चित्रपट गुरुवारी म्हणजेच आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर अनेकजण खुश आहेत. 'फायटर' चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी चित्रपटगृहांमध्ये पाहिला मिळत आहे.



या चित्रपटाचं दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे.

राकेश रोशननं दिली 'फायटर' चित्रपटावर प्रतिक्रिया : राकेश रोशननं हृतिक रोशनच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'फायटर' चित्रपटाचा रिव्ह्यू त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. राकेश रोशन यांनी हृतिकच्या चित्रपटाला 'सर्वोत्तम' म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी हृतिक, दीपिका, अनिल कपूर आणि सिद्धार्थ आनंदला सर्वोत्कृष्ट म्हटलं आहे.

 'फायटर'मध्ये हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोणची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. यासोबतच या दोन स्टार्सची केमिस्ट्रीही सगळ्यांनाच आवडली आहे. याशिवाय सोशल मीडियावर काहीजण 'फेव्हरेट कपल' असल्याचं या जोडीला म्हणत आहेत. चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहणारे नेटिझन्सनीही सोशल मीडियावर त्यांचे रिव्ह्यू शेअर करत आहे. हृतिक रोशन स्टारर 'फायटर'ला कौतुक करत चाहते 'ऑल टाईम ब्लॉकबस्टर' चित्रपट म्हणत आहेत.


'फायटर' रिलीज : 'फायटर' चित्रपटाची क्रेझ सध्या पाहायला मिळत आहे. चाहते 'फायटर' पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचत असताना, ते सोशल मीडियावर मूव्ही हॉलच्या आतील भागातील फोटो देखील शेअर करत आहेत.


 'फायटर' या चित्रपटाचे आगाऊ बुकिंग मोठ्या प्रमाणात झाले आहे. सॅकनिल्‍कच्या रिपोर्टनुसार 'फायटर'च्या आगाऊ बुकिंगनं देशभरात 279367 तिकिटे विकली गेली आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.