Header Ads

Geeta Exam: श्रीमद् भगवतगीतेच्या परिक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवून सौ.स्वाती राक्षे झाल्या ‘गीताव्रती’

 Geeta Exam: श्रीमद् भगवतगीतेच्या परिक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवून सौ.स्वाती राक्षे झाल्या ‘गीताव्रती’

Geeta Exam: श्रीमद् भगवतगीतेच्या परिक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवून सौ.स्वाती राक्षे झाल्या ‘गीताव्रती’


     Geeta Exam: अहमदनगर (प्रतिनिधी) - गीता परिवाराच्या वतीने घेण्यात आलेल्या श्रीमद् भगवतगीतेच्या पाठांतर परिक्षेत अकोळनेर येथील शेतकरी अ‍ॅड.सतीशचंद्र राक्षे यांच्या पत्नी सौ. स्वाती राक्षे यांनी 600 गुणांपैकी 599 गुण प्राप्त करून सर्वोत्कृष्ट श्रेणीत स्थान मिळविले. 


या परीक्षेमध्ये अध्यायाच्या पाठांतराबरोबर अध्यायाचे नाव सांगणे, कोणताही अध्याय तोंडपाठ म्हणून दाखवणे, उच्चारातील शुद्धता, अनुस्वार, विसर्ग, आघात शुद्धता या सर्व बाबी तपासण्यात येतात. यासर्व निकषांमधून आणि त्याचबरोबर वयाच्या 71 व्या वर्षी घर, शेती, नातवंडे, पतवंडे सांभाळून त्यांनी हे असामान्य यश प्राप्त केले.


     सौ.स्वाती राक्षे यांच्या या यशाबद्दल अहमदनगर येथील वाडियापार्क जलतरण तलावाचे संचालक गणेश कुलकर्णी आणि संचालिका सौ.भुपाली कुलकर्णी यांनी शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. त्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल अकोळनेर, नगर, पुणे, राहुरी, नागपूर येथील मान्यवरांकडून तसेच वकील संघाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


           हिंदू धर्माच्या अत्यंत पवित्र अशा प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण यांच्या मुखातून मानवजातीच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या भावविश्वातून जगात कसे सात्विक आचरण करून जीवनाचा हा अथांग भवसागर पार करावा, याचे मार्गदर्शन करणार्‍या श्रीमद भगवतगीतेचा सर्वांनी अभ्यास करून पाठांतर करण्यासाठी गीता परिवाराशी जोडावे, असे आवाहन सौ.स्वाती राक्षे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.