Header Ads

Kaikadi Samaj: या मेळाव्यातून नव उद्योजक-व्यावसायिक निर्माण होतील -आ.संग्राम जगताप

 कैकाडी समाजाचा व्यवसाय मार्गदर्शन मेळावा संपन्न

Kaikadi Samaj: या मेळाव्यातून नव उद्योजक-व्यावसायिक निर्माण होतील -आ.संग्राम जगताप
     अहमदनगर (प्रतिनिधी) -  आज कैकाडी समाजाचे पारंपारिक व्यवसाय जवळजवळ बंद पडलेले आहे. त्यामुळे समाजाने उद्योग-व्यवसायाकडे वळले पाहिजे. एक नोकरदार कुटुंबाचे एक घर चालवतो, परंतु एक उद्योग व्यावसायावर अनेक घरे चालतात. 


त्यामुळे अशा व्यावसाय मार्गदर्शन मेळाव्यातून नव उद्योजक-व्यावसायिक निर्माण होतील. या समाजातील लोक कष्टाळू व प्रामाणिक आहेत. समाजाच्या विविध उपक्रमांसाठी नगर शहरात जागा उपलब्ध करुन देण्याचा आपण प्रयत्न करु, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.


     अहमदनगर जिल्ह्यातील कैकाडी समाजाचा व्यवसाय मार्गदर्शन मेळावा नुकताच अक्षदा गार्डन येथे संपन्न झाला. याप्रसंगी आ.संग्राम जगताप,  विश्वासराव माने, उपमहापौर गणेश भोसले आदि मान्यवर उपस्थित होते.


     या मेळाव्यात महिला विकास महामंडळाचे श्री.गर्जे, खादी ग्रामोद्योगचे श्री.मुंडे, किमान कौशल्य विकास योजेनेचे श्री. सुर्यवंशी, लिड बँकेचे श्री.नवले, बँक ऑफ महाराष्ट्राचे एम.डी.नाईक, जिल्हा उद्योग केंद्राचे बिराजदार, वसंतराव नाईक विकास महामंडळाचे श्री.सांगळे आदि मान्यवरांनी उपस्थित दर्शविली.


     कार्यक्रमाचे प्रास्तविक कारभारी गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन अ‍ॅड.किरणताई जाधव यांनी तर आभार डी.आर.गायकवाड यांनी मानले.


     याप्रसंगी कैकाडी समाज भूषण पुरस्कार रविंद्र गायकवाड दांम्पत्यांचा आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते देण्यात आला. कार्यक्रमास संतोष गायकवाड, हौशिराम गायकवाड, अशोक जाधव, किशोर जाधव, कुंडलिक जाधव, भिमराव जाधव, राजू गायकवाड, मनोहर गायकवाड, महादेव माने (शहराध्यक्ष), विलास माने, बाळासाहेब गायकवाड, मुलूखराज गायकवाड, अ‍ॅड.विनोद गायकवाड, बाबा जाधव, गणेश गायकवाड  आदि मान्यवरांसह समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.