Header Ads

Kedgao: ग्लोबोलायझन प्राप्त झाल्याने आज खेळातही करिअरच्या अनेक संधी - भुषण मोरे

 Kedgao: भाग्योदय विद्यालयाचा क्रीडा मेळावा संपन्न


Kedgao: भाग्योदय विद्यालयाचा क्रीडा मेळावा संपन्न     Kedgao: अहमदनगर (प्रतिनिधी)  -    आजची पिढी ही मोबाईलमध्ये गुंतलेली दिसून येते, त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुलांमध्ये शारीरिक, मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. सकस अन्न आणि व्यायाम याचा अभाव ही त्यामागील प्रमुख कारणे आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासबरोबरच मैदानी खेळ खेळले पाहिजे. आपल्या शारीरिक क्षमता चांगली राहिल्यास अभ्यासतही मन लागते. प्रत्येकामध्ये काहीतरी क्षमता असते, त्या क्षमतांचा उपयोग करुन एखाद्या खेळात आपण प्राविण्य दाखविले पाहिजे. 


  आज खेळालाही ग्लोबोलायझन प्राप्त झाल्याने खेळातही करिअरच्या अनेक संधी आहेत, त्यामुळे खेळलाही महत्व दिले पाहिजे, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन उपायुक्त भुषण मोरे यांनी केले.


     केडगांव येथील भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक क्रीडा मेळाव्याचे उद्घाटन अन्न व औषध प्रशासन उपायुक्त भुषण मोरे यांच्या हस्ते हवेत फुगे सोडून करण्यात आले. याप्रसंगी अन्न सुरक्षा अधिकारी डॉ.प्रदीप पवार,  संस्थेचे सचिव रघुनाथ लोंढे, प्राचार्य ज्ञानदेव बेरड, जालिंदर कोतकर, पै.खैरे आदि उपस्थित होते.


     याप्रसंगी डॉ.प्रदीप पवार म्हणाले, मुलांनी मैदानी खेळ खेळले पाहिजे, व्यायाम करावा. लहानपणापासून चांगल्या सवयी लावून घ्याव्या, असे आवाहन केले. पै.खैरे यांनी कुस्ती, बॉक्सिंग, पोहणे असे सर्व खेळात सहभागी झाले पाहिजे. आज अनेक स्पर्धा होत आहेत, त्यात आपले कौशल्य दाखवून शाळेचे नाव उंचवावे.


     संस्थेचे सचिव रघुनाथ लोंढे यांनीही संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी संस्थेच्यावतीने सर्वोतोपरि प्रयत्न केले जात आहे. आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शिक्षकांच्या सहकार्याने विद्यार्थीही विविध स्पर्धा, परिक्षांमध्ये यश मिळवत आहे, याचा संस्थेला अभिमान आहे.


     यावेळी प्राचार्य ज्ञानदेव बेरड म्हणाले, विद्यार्थ्यांना अभ्यासबरोबरच विविध क्रीडा प्रकारासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे अनेक जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यालयाचे विद्यार्थी विविध स्पर्धांमध्ये यश मिळवत आहे, ही अभिमानास्पद बाब आहे. क्रीडा मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील कला-गुणांना वाव मिळत असल्याने विद्यार्थ्यांतील क्षमतांचाही विकास होतो.


     कार्यक्रमाचे प्रास्तविक गोरख कांडेकर यांनी केले तर सूत्रसंचालन दत्तात्रय पांडूळे यांनी केले. शेवटी धनंजय बारगळ यांनी आभार मानले. या मेळाव्याचे नियोजन क्रीडा शिक्षक सोपान तोडमल, एकनाथ होले यांनी केले. क्रीडा मेळावा यशस्वीतेसाठी प्रा.गोविंद कदम, बाबासाहेब कोतकर, साहेबराव कार्ले, आदिनाथ ठुबे, रुपाली शिंदे, रेणुका गुंड आदिंनी परिश्रम घेतले.


     या क्रीडा मेळाव्यात धावणे, गोळाफेक, भालाफेक, उंच उडी, खो-खो, मनोरंजनात्मक खेळ, संगीत खुर्ची, पोते स्पर्धा स्लो सायकलिंग, रांगोळी आदि स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.