Header Ads

Markendeya Patsanstha: उपनिबंधकानी दिले संचालकांकडून ५,८१,४८४ रुपये वसुलीचे आदेश

 मार्कंडेय पतसंस्थेचे संचालकांनी केले संस्थेचे आर्थिक नुकसान
तालुका उपनिबंधकानी दिले संचालकांकडून ५,८१,४८४ रुपये वसुलीचे आदेश 

Markendeya Patsanstha: उपनिबंधकानी दिले संचालकांकडून ५,८१,४८४ रुपये वसुलीचे आदेश          अहमदनगर (प्रतिनिधी) -श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालकांनी संस्थेचे आर्थिक नुकसान केल्याबाबत व नियमबाहय कर्ज वाटप केल्याबाबत संस्थेचे सभासद रमेश यलय्या नागुल व इतर ४६ सभासदांनीतालुका उपनिबंधक सहकारी संस्था यांचेकडे तक्रार दाखल केली होती.सदर तक्रारीची चौकशी प्रविण पिंगळे विशेष लेखा परिक्षक, श्रेणी-१ यांनी केली. त्यानूसार संस्थेने श्री मार्कडेय अभ्यासिका व ट्रस्ट स्थापन करण्यासाठी व संस्थेचे जागेचे मिळणारे भाडे असे एकुण रक्कम रुपये ५,८१,४८६/-चे आर्थिक नुकसान केले.


तसेच संस्थेचे संचालकांनी संस्थेच्या पोट नियमातील उद्देशा प्रमाणे व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ नूसार कामकाज केले नाही.त्याचप्रमाणे अमर देविदास बोरा या कर्जदाराला त्यांच्या मालमत्तेच्या मुल्याकनापेक्षा जास्त कर्ज दिलेले असल्यामुळे व सदर मुळ मालकाने जनरल मुखत्यारपत्राबाबत वाद उपस्थित केल्याने सदरची बाब न्याय प्रविष्ठ झाली व सदरचे कर्ज असुरक्षीत झाले. 


         त्यामुळे सदरच्या कर्जाची संपूर्ण जबाबदारी संचालकांवर टाकण्यात आली व तसा आदेश मा. उपनिबंधक साहेब,सहकारी संस्था यांनी पारीत केलेले आहे.याबाबत माहिती अशी कि मार्कडेय नागरी सहकारी पतसंस्था मर्या.दिल्लीगेट,अहमदनगर यांचे विरुध्द रमेश यलय्या नागुल व इतर ४६ यांनी दि. ०३/१०/२०२३ रोजी संस्थेच्या संचालका मार्फत होत असलेल्या अदागोंदी कारभाराबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी असा अर्ज दिला होता.


तसेच दि. १७/०९/२०२३ रोजी सर्वसाधारण सभेमध्ये अभ्यासिकेचा खर्च तसेच इतर विषयास सभासदांचा विरोध असतांना देखील सदर विषय सर्वानुमते मंजुर झालेला नसतांना देखील संचालक मंडळाने दि. २५/०९/२०२३ रोजीचे वृत्तपत्रामध्ये सर्व विषय मंजुर असे बनावट कथन प्रसिध्द करुन सभासदांचे फसवणुक केलेले होती. 


           तसेच मुद्दा क्रं१ संस्थेच्या दुस-या मजल्यावर अभ्यासिका चालु केल्याबाबत.मुद्दा क्रं२ दि.०८/०३/२०२३ रोजीच्या ठराव क्रं. ७ प्रमाणे अमर देवीदास बोरा यास रक्कम रु.२०,००,०००/-चे कर्ज मंजुर केलेले कर्ज नियमबाहय व खरेदीखत बनावट ठरल्यास अथवा रद्द झाल्यास गहाणखतान्वये दिलेली रक्कम व्याजासह संपुर्ण परतफेड करण्याची जबाबदारी संचालक मंडळ व शिफारस करणारे संचालक स्विकारणार का?सदर कर्जदार हा विद्यमान चेअरमन यांचा नातेवाईक असल्यामुळे सदर प्रकरणाकडे गांभीर्याने न पाहता सदर कर्ज वितरीत केल्याचे दिसून येत आहे.असे म्हटले होते 


           तसेच वरील नमुद केलेल्या गंभीर बाबींची दखल घेवुन सदर संस्थेच्या संचालका मार्फत होत असलेल्या अनागोंदी कारभाराबाबत योग्य ते कारवाईचे आदेश पारीत करण्याचे विनंती केलेली होती. सदर अर्जाची गंभीर दखल घेवुन तालुका उपनिबंधक,सहकारी संस्था यांनी श्री मार्कडेय नागरी सहकारी पतसंस्था मर्या.संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळा विरुद्ध चौकशीचे आदेश दिले होते 


           याची चौकशी होऊन संचालका कडून सदरच्या संपूर्ण जबाबदारी संचालकांवर टाकण्यात आली व रुपये ५,८१,४८६ वसुलीचे आदेश उपनिबंधक साहेब,सहकारी संस्था यांनी पारीत केलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.