Header Ads

Mukundnagar: दारुल उलूम रज़ा ए मेहबूब मदरसात प्रजासत्ताक उत्साहात

 Mukundnagar: दारुल उलूम रज़ा ए मेहबूब मदरसा मध्ये सालाबादप्रमाणे प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा

Mukundnagar: दारुल उलूम रज़ा ए मेहबूब मदरसा मध्ये सालाबादप्रमाणे प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजराअहमदनगर : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 26 जानेवारी 2024 ला आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन हा दारुल उलूम रज़ा ए मेहबूब येथे ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला.यावेळी मदरसातील विद्यार्थयांनी गणवेशात शिस्तबद्ध रांगा लाऊन रॅली मध्ये मोठ्या उत्साहात उपस्थित होते.

मदरसाच्या मुख्य मैदानावर काँग्रेसचे नगरसेवक आसिफ सुल्तान यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राजूभाई शेख, नगरी धुमाकूळ निर्माते संजय जाधव, विकास झांजे, काँग्रेसचे युवा नेते अन्वर सय्यद, काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अलतमश जरीवाला, मुसद्दीक मेमन, काँग्रेस युवकचे धडाडीचे युवा नेते मोहम्मद मुबीन वलीयोद्दीन शेख, आर्किटेक्ट फिरोज़ शेख, आबीद खान पत्रकार, खत्मे कादरीया ग्रूपचे सर्व सदस्यसह मुकुंदनगर भागातील काही ज्येष्ठ नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 याप्रसंगी मदरसातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय देशप्रेमावर आधारित गीत सादर केली. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छापर मार्गदर्शन केले.

मदरशामधील विद्यार्थ्यांना समाजात आणि शहरात तळमळीने सामाजिक काम करणारे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते नेत्रमित्र राजूभाई शेख यांच्यातर्फे मिठाई वाटपाने कार्यक्रमाचा समारोप झाला.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे विश्वस्त खलिफा ए मन्सूरे मिल्लत हाजी शेख बाबर चाँद कादरी रज़वी मेहबूबी रब्बानी, शेख नदीमभाई कादरी रज़वी, शेख रफिक केडगाव, सय्यद अलीमुद्दीन, शेख तहनूर कादरी, मौलाना शाहीद कादरी रज़वी, मुन्शी मामू, नदीम रज़ा, फरीयाद बागबान, अदीब शेख, मुज़म्मिल शेख इत्यादींनी प्रयत्न केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.