Header Ads

Nagar Taluka: संपूर्ण मतदार संघाचा विकास हेच शिवाजीराव कर्डिले यांचे ध्येय - अक्षय कर्डिले

 Nagar Taluka:  देवगांवात महादेव मंदिर सभामंडप-वॉटर प्लांटचा शुभारंभ

Nagar Taluka: संपूर्ण मतदार संघाचा विकास हेच शिवाजीराव कर्डिले यांचे ध्येय - अक्षय कर्डिले     Nagar Taluka: अहमदनगर (प्रतिनिधी) - गेल्या 30 वर्षांपासून नगर तालुक्यातील गावांच्या विकासासाठी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले  हे कायम कार्यरत आहेत. लोकही त्यांच्यावर विश्वास ठेवून कायम त्यांच्या पाठिशी असतात.  नगर तालुक्याच्या विकासाकडे कर्डिले साहेबांनी कधीच दुर्लक्ष केले नाही. प्रत्येक गावात त्यांनी केलेल्या विकास कामांमुळे जनता त्यांना साथ देत आहे. 


नगर तालुक्यांसह संपूर्ण मतदार संघाचा विकास करणे हेच श्री.शिवाजीराव कर्डिले यांचे एकमेव ध्येय आहे. देवगांवच्या विकासातही माजी सभापती विलासराव शिंदे यांचे मोठे योगदान राहिले आहे, आताही सरपंच राणीताई शिंदे यांच्या माध्यमातून होत असलेल्या कामांमुळे गावाच्या विकासात भर पडत आहे, असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे  जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांनी केले.


     नगर तालुक्यातील देवगाव येथे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रयत्नातून  महादेव मंदिर सभामंडप, आर.ओ. ट्रिटेड वॉटर प्लांट  कामाचा शुभारंभ श्री.अक्षय कर्डिले यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विलास शिंदे, 


 सरपंच राणीताई शिंदे, उपसरपंच आशा शिंदे, रमेश शिंदे, माजी सरपंच संभाजी वामन, ग्रामसेवक अरविंद शेळके, मच्छिंद्र शिंदे, सोमनाथ वामन, हरिदास खळे, अमित बोराळकर, अमोल खेडकर, दादासाहेब काटकर, अमोल शिंदे, राजू वामन, अंकुश वामन, दिलीप ताकरे, संदिप शिंदे, अशोक शिंदे, सरस्वती शिंदे, कमल शिंदे, भामा शिंदे आदि उपस्थित होते.


     माजी सभापती विलास शिंदे म्हणाले, माजी आ.शिवाजीराव कर्डिले यांनी देवगांवच्या विकासासाठी भरीव निधी दिला. त्यामुळे गावातील रस्ते, पाणीप्रश्न, विविध विकास कामे मार्गी लागली आहेत. त्यांच्या प्रयत्नातून जि.प.च्या सेस फंडातून महादेव मंदिर सभामंडप, आर.ओ. ट्रिटेड वॉटर प्लांटचा आज शुभारंभ होत आहे. 


यामुळे गावाला शुद्ध पाणी मिळणार आहे. देवगावमधील स्मशानभुमीचा प्रश्न, देवगांव-ससेवाडी, देवगाव-शहापूर रस्त्यांची कामे मंजूर असून, दलित वस्ती सुधार योजनेमधून अनेक कामे सुरु होतील. मळगंगा देवी मंदिर समोर पेव्हींग ब्लॉक असे अनेक कामे पुढील टप्प्यात पूर्ण करण्यात येणार असल्याचे सांगितले.


     यावेळी प्रास्तविकात सरपंच राणीताई शिंदे म्हणाल्या, गावाच्या विकासासाठी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे मोठे सहकार्य लाभत आहे. त्यामुळे गावातील विविध विकास कामांना चालना मिळत आहे. गावाच्या विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने आपण योगदान देऊ असे सांगितले.


     यावेळी कुंडलिक वामन, मारुती शिंदे, पोपट वामन, कविता वामन, कौसाबाई वामन,शिवाजी शिंदे, विश्वनाथ शिंदे, विजय वामन, विजय शिंदे, मुकिंदा वामन, बापू वाकचौरे, दत्तू शिंदे, अंबादास वामन, जालिंदर वामन, सुरेश वामन आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. रमेश शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.