Header Ads

Patrakar Din Ahmednagar: समाजातील प्रश्न पत्रकार मांडतात त्यामुळे पदाधिऱ्यांना कामे करणे अधिक सोपे जाते : आमदार संग्राम जगताप

 Patrakar Din Ahmednagar: समाजातील प्रश्न पत्रकार मांडतात त्यामुळे पदाधिऱ्यांना कामे करणे अधिक सोपे जाते : आमदार संग्राम जगताप

Patrakar Din Ahmednagar: समाजातील प्रश्न पत्रकार मांडतात त्यामुळे पदाधिऱ्यांना कामे करणे अधिक सोपे जाते : आमदार संग्राम जगतापPatrakar Din Ahmednagar:  अहमदनगर : ‘‘समाजातील प्रश्न पत्रकार मांडतात. त्यामुळे पदाधिकारी, अधिकाऱ्यांना कामे करणे अधिक सोपे जाते. शहराचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामध्ये पत्रकार वारंवार भूमिका घेऊन लिखान करतात. विकासाच्या प्रक्रियेत त्यांची भूमिका महत्त्वाची आहे,’’ असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अहमदनगर प्रेस क्लब, अहमदनगर पत्रकार संघ व अहमदनगर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज महानगर पालिकेच्या राजमाता जिजाऊ सभागृहात पत्रकार दिन साजरा करण्यात आला. या वेळी अध्यक्षीय भाषणात आमदार जगताप बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ,जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे, ज्ञानेश कुलकर्णी,अशोक झोटिंग,आदिल शेख,सुशील थोरात  आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले,की समाजातील प्रश्नांबाबत पत्रकार भूमिका मांडतात. हे लिखान पदाधिकारी, अधिकाऱ्यांना मार्गदर्शक ठऱते. पत्रकारांची कामाची धावपळ आपण पाहतो. त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन कामांचे नियोजन करायला हवे.

पोलिस अधीक्षक ओला म्हणाले, की पत्रकारांनी कायद्याचा अभ्यास आवश्य करावा. त्याचा पत्रकारितेत चांगला फायदा होईल. अभ्यासपूर्ण लिहिलेले लेख कायम स्मरणात राहते. बातमीचे आयुष्य कमी असते; परंतु भूमिका घेऊन लिहिलेले लेख अमर असतात. कायदा-व्यवस्थेसाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असते.

प्रारंभी अहमदनगर पत्रकार संघाचे सचिव शिवाजी शिर्के यांनी स्वागत केले. अध्यक्ष अनंत पाटील यांनी प्रास्तविकातून पत्रकार संघाची भूमिका विषद केली. राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. अमोल बागुल यांनी प्रास्तविक केले. ‘मनपा’चे उपायुक्त अजित निकत यांनी आभार मानले.


‘मनपा’च्या वतीने स्व. महेंद्र कुलकर्णी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांना प्रदान करण्यात आला. ५१ हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे त्याचे स्वरुप होते. 

स्व. महेंद्र कुलकर्णी उत्कृष्ठ बातमीदार पुरस्कार मोहिनीराज लहाडे यांना प्रदान करण्यात आला.३१ हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे त्याचे स्वरुप होते. 


 साप्ताहिक दर्शकचे संपादक ज्येष्ठ पत्रकार रियाज शेख यांना अहमदनगर  प्रेस क्लबच्यावतीने पुरस्कार देण्यात आला

साप्ताहिक दर्शकचे संपादक ज्येष्ठ पत्रकार रियाज शेख यांना अहमदनगर  प्रेस क्लबच्यावतीने पुरस्कार देण्यात आलाअहमदनगर  प्रेस क्लबच्यावतीने देण्यात आलेले बेस्ट रिपोर्टर पुरस्कार ‘सकाळ’चे श्रीकांत राऊत, ‘लोकमत’चे चंद्रकांत शेळके, ‘पुण्यनगरी’चे महेश देशपांडे, ‘सार्वमत’चे सचिन दसपुते, ‘पुढारी’चे गोरक्ष शेजूळ, ‘दिव्य मराठी’चे दीपक कांबळे, ‘नगर सह्याद्री’चे सुनील चोभे, ‘समाचार’चे भाऊसाहेब होळकर, ‘मराठवाडा केसरी’चे बाळकृष्ण गारडे, 

इलेक्ट्रॉनिक मीडियामधून कुणाल जायकर,श्रीराम जोशी, दीपक रोकडे, दत्ता इंगळे, डॉ. सूर्यकांत वरकड, समीर दाणी आदींना कर्तृत्वाबद्दल गौरविण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.