Header Ads

Patrakar Din: दर्शकचे संपादक रियाझ शेख यांना स्व भास्करराव डिक्कर स्मृती पुरस्कार जाहीर

अहमदनगरमध्ये पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन


बेस्ट रिपोर्टर पुरस्कारांची घोषणा | मान्यवरांच्या उपस्थितीत होणार पुरस्कार वितरण

अहमदनगर / प्रतिनिधी
अहमदनगर प्रेस क्लब तथा अहमदनगर पत्रकार संघ यांच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून शनिवार, दि. ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर महापालिकेच्या राजमाता जिजाऊ सभागृहात सकाळई १० वाजता होणार्‍या या कार्यक्रमास पत्रकार बांधव तसेच नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघाचे अध्यक्ष अनंत पाटील यांनी केले आहे.

पत्रकार दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकार संघाच्या वतीने बेस्ट रिपोर्टर ऑफ द इयर २०२३ पुरस्कार दिला जाणार असून यासाठी निवड झालेल्या पत्रकारांना मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. 

पुरस्कारासाठी निवड झालेल्या पत्रकारांमध्ये चंद्रकांत शेळके (लोकमत), श्रीकांत राऊत (सकाळ), महेश देशपांडे (्पुण्यनगरी), सचिन दसपुते (सार्वमत), गोरक्ष शेजुळ (पुढारी), दीपक कांबळे (दिव्यमराठी), जयंत कुलकर्णी (प्रभात), सुनील चोभे (नगर सह्याद्री), भाऊसाहेब होळकर (समाचार), कुणाल जायकर (इलेक्टॉनिक मिडीया), बाळकृष्ण गारडे (मराठवाडा केसरी) यांचा समावेश आहे.

 स्व. भास्करराव डिक्कर स्मृती पत्रकारीता पुरस्कार - ज्येष्ठ पत्रकार रियाजभाई शेख (साप्ताहीक दर्शक) यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती संघाचे उपाध्यक्ष मुरलीधर कराळे व अण्णासाहेब नवथर यांनी दिली.

आ. संग्राम जगताप, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला आणि महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असून याच कार्यक्रमात पदोन्नती व अन्य विशेष पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीराम जोशी (नगर टाईम्स), दीपक रोकडे (पुढारी), दत्ता इंगळे (प्रेस फोटोग्राफर, सकाळ), डॉ. सुर्यकांत वरकड (पुढारी) यांचाही मानचिन्ह देऊन सन्मान केला जाणार असल्याचे संघाचे सचिव शिवाजी शिर्के यांनी सांगितले.

स्व. महेंद्र कुलकर्णी स्मृती पत्रकारीता
पुरस्करांचेही होणार वितरण
ज्येष्ठ पत्रकार व दैनिक समाचारचे मालक, संपादक स्व. महेंद्र कुलकर्णी यांचे पत्रकारीता क्षेत्रात मोठे योगदान राहिले. त्यांच्या स्मृती कायम राहाव्यात या उद्देशाने अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या नावाने जीवन गौरव आणि उत्कृट बातमीदार असे दोन पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांना स्व. महेंद्र कुलकर्णी जीवनगौरव पत्रकारीता पुरस्कार देण्यात येणार आहे. ५१ हजार रुपये, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच स्व. महेंद्र कुलकर्णी उत्कृष्ट बातमीदार पुरस्कार लोकसत्ताचे मोहिनीराज लहाडे यांना जाहीर झाला असून ३१ हजार रुपये, मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. हे दोन्ही पुरस्कार अहमदनगर महापालिकेने सुरु केले असून दरवर्षी हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.