Header Ads

Samarth School: प्रजासत्ताक दिन भारतीयांच्या मनामनात चैतन्य भरून टाकतो - सुभाष गुंदेचा

 श्री समर्थ विद्यामंदिर सांगळे गल्ली विभागात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

Samarth School: प्रजासत्ताक दिन भारतीयांच्या मनामनात चैतन्य भरून टाकतो - सुभाष गुंदेचा   अहमदनगर (प्रतिनिधी)  - श्री समर्थ विद्यामंदिर सांगळे गल्ली येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष  सुभाष गुंदेचा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  यावेळी अध्यक्षस्थानी श्री समर्थ विद्यामंदिर माध्यमिक विभाग शालेय समिती चेअरमन स्वप्निल कुलकर्णी होते. 


यावेळी मंडळाचे श्रीपाद कुलकर्णी, बँक ऑफ बडोदाचे चीफ मॅनेजर दिलीप ढोबळे, सतीश कुलकर्णी, कीर्ती जोशी, मेजर बापूसाहेब भापकर, स्वप्निल पावनकर, सय्यद, अमोल आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी विद्यार्थिनीनी  राष्ट्रगीत,ध्वजगीत व देशभक्तीपर गीत सादर केले.


     यावेळी सुभाष गुंदेचा म्हणाले, 26 जानेवारी हा दिवस सर्व भारतीय मनामनात चैतन्य भरून टाकतो व देशभक्ती विषयीची मानसिकता बळकट करतो. विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त केलेले विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहेत. श्री समर्थ विद्यामंदिर शाळेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे व अभ्यासपूरक उपक्रम राबविणे यावर भर दिला जातो आणि त्याचे च प्रतीक म्हणजे विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश होय. शाळेची अशीच प्रगती हो होवो अशा शुभेच्छा त्यांनी आपल्या मनोगतातून दिल्या.


     स्वप्नील कुलकर्णी यांनी  मनामध्ये देशभक्ती राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवावी. राष्ट्रासाठी मला काय करता येईल याचा सतत विचार करावा व त्या दृष्टीने कृती करावी. शाळेतून मूल्य संस्काराचे धडे तर दिले जातातच त्या दिशेने मार्गक्रमण करावे असे आवाहन  केले.


      मुख्याध्यापिका सौ.संगीता सोनटक्के यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.  त्यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले, विद्यार्थ्यांनी मनामध्ये देशभक्ती रुजवावी. देशासाठी मला काय करता येईल?  हा विचार करावा. आज भारत मातेला वंदन करून स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या व्यक्तींचा स्मरण करायला पाहिजे डॉक्टर आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सादर केलेल संविधान राज्य कारभार सुरळीतपणे व शिस्तबद्ध चालण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे आज अशा सर्व वीरांना आपण वंदन करूया असे त्या म्हणाल्या.


      सुभाषजी गुंदेचा यांचा सन्मान स्वप्नील कुलकर्णी यांनी केला, तर उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार मुख्याध्यापिका सौ. संगीता सोनटक्के यांनी केला. यावेळी शिक्षकांनी प्राप्त केलेले पुरस्कार व यशाबद्दल सौ.शारदा होशिंग, सौ. श्रुती कुलकर्णी, लीना बंगाळ यांचा अध्यक्षांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. 


तर विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांना सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमास मंडळाचे व्हाईस चेअरमन व प्राथमिक विभाग शालेय समिती चेअरमन श्रीपाद कुलकर्णी माध्यमिक विभागाच्या  मुख्याध्यापिका सौ संगीता सोनटक्के प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अजय महाजन ,बँक ऑफ बडोदा चे मॅनेजर व त्यांची टीम तसेच शिक्षक शिक्षकेतर सहकारी पालक वर्ग व परिसरातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती कुलकर्णी यांनी केले तर आभार श्रीमती श्रद्धा नागरगोजे यांनी मांडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.