Header Ads

Satkar: कौटूंबिक जबाबदारी सांभाळून महिलांचे व्यावसायिक यश कौतुकास्पद - निलेश पवळे

 Satkar:  सौ.कांचन मोरे - सौ.स्नेहल औटी यांचा नाभिक महामंडळातर्फे सत्कार

Satkar:  सौ.कांचन मोरे - सौ.स्नेहल औटी यांचा नाभिक महामंडळातर्फे सत्कार     Satkar:  अहमदनगर (प्रतिनिधी) - घर, संसार सांभाळून नोकरी, व्यवसाय करणार्‍या महिलांचा प्रवास खडतर असतो. अशा परिस्थितीतही व्यावसायात यशस्वी होत पुरस्कारापर्यंत भरारी घेणार्‍या नाभिक समाजातील महिलां या आपणा सर्वांसाठी आदर्शवत आहेत.  सौंदर्य क्षेत्रात कार्य करत ‘ब्युटी अ‍ॅवॉर्ड’ प्राप्त करुन त्यांनी आपल्यातील प्रगल्भता दाखवून दिली आहे. त्यांना मिळालेला पुरस्कार हा इतरांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन नाभिक महामंडळाचे युवक जिल्हाध्यक्ष निलेश पवळे यांनी केले.


     अहमदनगर येथील सौंदर्यातज्ञांचा सन्मानमध्ये कांचन मोरे व स्नेहल औटी यांना ब्युटी अ‍ॅवॉर्ड 2023 ने गौरविण्यात आल्याबद्दल नाभिक महामंडळाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, युवक जिल्हाध्यक्ष निलेश पवळे, बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, अनिल औटी, अनिल निकम, आशिष ताकपेरे, प्रभाकर साळूंके, बाबुराव ताकपेरे, श्रीपाद वाघमारे, विशाल सैंदाणे, दिपक काशिद, बबन काशिद, रमेश बिडवे, संतोष जाधव, सुशिल थोरात, सचिन खंडागळे, शंभु राऊत, विशाल साळूंके, सागर औटी, महेश मोरे आदिंसह समाज बांधव उपस्थित होते.


     पुढे बोलतांना निलेश पवळे म्हणाले, नाभिक महिलांचा सन्मान हा आमचा मोठेपणा वाढविणारा आहे. ब्युटी पार्लरच्या माध्यमातून त्यांनी कला व कौशल्याचा अनुभव अवगत करण्याची संधी मिळते. या भगिनींनी समाजातील मुला-मुलींना सेमिनारच्या माध्यमातून मार्गदर्शन करावे, असे सुचविले.


     यावेळी बाळासाहेब भुजबळ  म्हणाले, कांचन मोरे व स्नेहल औटी यांच्या अ‍ॅकॅडमीमधून असंख्य व्यावसायिक चांगल्याप्रकारे शिक्षण घेऊन व्यवसायात यशस्वी होत आहेत. नवीन सेमिनार व आर्थिक परिस्थिती नसलेल्या युवक-युवतींचा मोफत शिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवावे, असे आवाहन केले.


     सत्कारास उत्तर देतांना सौ.मोरे व सौ.औटी या म्हणाल्या की, आमचा सन्मान हा सर्व नाभिक समाजाचा सन्मान आहे. अशा सन्मान व सत्काराने आमच्या कार्यास आम्हाला प्रेरणा मिळणार आहे. आमच्या अ‍ॅकॅडमीच्या माध्यमातून चांगले विद्यार्थी घडत आहेत. मान्यवरांच्या सुचनेनुसार भविष्यात गरजू मुला-मुलीना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्यास मदत करु, असे सांगितले.सूत्रसंचालन अनिल औटी यांनी केले तर सचिन खंडागळे यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.