Header Ads

Savedi Mandir: श्रीरामांच्या जयघोषाने सावेडीतील स्वामी समर्थ मंदिर दुमदुमले

 

Savedi Mandir: महाआरती-महाप्रसाद वाटप - भाविकांमध्ये आनंदी-आनंद


Savedi Mandir: श्रीरामांच्या जयघोषाने सावेडीतील स्वामी समर्थ मंदिर दुमदुमले

(Photo Vijay Mate Ahmednagar)


     अहमदनगर (प्रतिनिधी) - सावेडी उपनगरातील गुलमोहोर रोडवरील श्री अक्कलकोट निवासी वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिरात आयोध्या येथे पार पडत असलेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


     पहाटे श्रीं च्या मुर्तीस अभिषेक, प्रभुरामचंद्रांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन श्रीराम रक्षा स्त्रोत्रचे सामुदायिक पठण करण्यात आले. महिला भजनी मंडळाने श्रीरामांची भजने गायली. श्रीरामांच्या जय घोषाने मंदिर परिसर दुमदुमूण गेला होतो.


     दुपारी नैवद्य अर्पण करुन प्रभुश्रीरामांना लाडूचा नैवद्य दाखविण्यात आला. महाआरती करण्यात येऊन सुमारे 4 ते 5 हजार लाडूंचा महाप्रसाद भाविकांना वाटण्यात आला.


     प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचा क्षण असंख्य श्रीराम भक्तांच्या बलिदानातून साकार झाला आहे. सर्वसामान्यांच्या योगदानामुळे आपली स्वप्नपूर्तीचाच उत्सव साजरा होत आहे. या भावनेने प्रत्येक रामभक्त उत्साहाने या सोहळ्यात सहभागी होत होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.