Header Ads

Savedi: मंदिरे हि आपली ऊर्जा केंद्र आहेत-पालकमंत्री राधाकृष्ण विखे

 

Savedi: सावेडीतील अय्यप्पा मंदिराला भेट व पूजा

 
Savedi: सावेडीतील अय्यप्पा मंदिराला भेट व पूजा


        savedi: अहमदनगर (प्रतिनिधी)-मंदिरे हि आपली ऊर्जा केंद्र आहेत,तेथून आपणाला शक्ती मिळते असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सावेडीतील अय्यप्पा मंदिराला भेट देऊन पूजा केली त्यावेळी ते बोलत होते यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले,भाजपाचे अभय आगरकर,भैय्या गंधे,शिवसेनेचे आनंदराव शेळके आदी सह मंदिराचे ट्रस्टी व भाविक उपस्थित होते 


         ते पुढे म्हणाले अयोध्येतील मंदिरात रामलल्ला मूर्ती स्थापना करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने पूर्ण दिवस जिल्हातील विविध मंदिरांना भेटी दिल्या व पूजा केली.श्रीराम चरणी नगर जिल्ह्यात तब्बल 21 लाख लाडूंचा विश्वविक्रमी नैवेद्य विखे परिवाराच्या माध्यमातून दिलेल्या साखर आणि डाळीतून २१ लाख लाडूंचा नैवद्य दाखवला जाणार आहे हि आमच्या दृष्टीने भाग्याची गोस्ट आहे. या निमित्ताने देशभर दिवाळी सारख्या सणाचा माहोल असणार असून नगर जिल्ह्यातही श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्ताने असणारा उत्साह केवळ मोठाच नव्हे तर विश्वविक्रमी होणार आहे. 

Savedi: मंदिरे हि आपली ऊर्जा केंद्र आहेत-पालकमंत्री राधाकृष्ण विखे

(Photo Mahesh Kamble Ahmednagar         जिल्ह्यातील देवी-देवतांची मंदिरे आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाली असून,भगव्या पताकां,सडा-रांगोळ्यानी सजवली जाणार आहेत.अनेकांनी महाआरती,महाप्रसाद, भजन-कीर्तन यांचे आयोजन तर राम-सीता वेशभूषा, रांगोळी स्पर्धा असे विविधावीत कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन केले असून घराघरात दिवे-पणत्या,आकाश कंदील,रांगोळी, गोडधोड जेवण करून दीपावली सणा सारखा हा दिन साजरा होणार आहे असेही ते म्हणाले 


        मंदिराचे पुजारी यांनी भगवान अय्यप्पा स्वामी व मंदिराबद्दल माहिती दिली तर बाबूशेठ टायरवाले यांनी त्याचा सत्कार केला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.