Header Ads

SavitriFatima: सावित्रीमाई प्रमाणे फातेमाबी शेख यांचे कार्यही तितकेच महत्त्वाचे - युनूस तांबटकर

 SavitriFatima: पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त मखदूम सोसायटी तर्फे मोफत पुस्तके वाटप

SavitriFatima: सावित्रीमाई प्रमाणे फातेमाबी शेख यांचे कार्यही तितकेच महत्त्वाचे - युनूस तांबटकर
SavitriFatima:  अहमदनगर - महाराष्ट्रातील सामाजिक प्रबोधनाची नांदी फुले दाम्पत्यांनी केली. महात्मा फुले यांचे कार्य राष्ट्रीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. पण त्याचबरोबर त्यांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणाऱ्या फातेमा बी शेख यांचे कार्यही तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर यांनी केले.

मखदूम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने मुस्लिम समाजाच्या पहिल्या शिक्षिका फातेमा बी शेख यांच्या 193 व्या जयंतीनिमित्त माणिक चौक येथील ए टी यु जदीद उर्दू प्रायमरी शाळेत विद्यार्थ्यांना मोफत उर्दू साहित्याची पुस्तके वाटप करण्यात आली. यावेळी रहमत सुलतान फाउंडेशनचे अध्यक्ष युनूसभाई तांबटकर, मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष इंजि. अभिजीत एकनाथ वाघ, मखदूम सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान, मुख्याध्यापक खान नासिर ख्वाजालाल, जुनेद शेख, अन्सार शेख, इमरान खान, शेख दानिश, पटेल झिशान, सैफ शेख, तसलीम पठाण, शौकत शेख आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना युनूस तांबटकर म्हणाले की तीन हजार वर्षे मुलींच्या कुंडलित नसलेला शिक्षणाचा हक्क ज्योतिबांनी आणला. त्याला जसे सावित्रीबाईची साथ लाभली त्याचप्रमाणे फातेमा शेख ची ही तोला मोलाची साथ होती. सन 1856 मध्ये सावित्रीमाई आजारी पडल्या तेव्हा फातिमा शेख यांनी त्यांच्या सर्व कामांची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली होती.

 म्हणूनच सावित्रीबाईंच्या कार्याबरोबर फातिमा शेख यांच्या देखील कार्याचे स्मरण आपण केले पाहिजे असे ते म्हणाले. अभिजीत वाघ यांनी मखदूम सोसायटीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्याचे कौतुक केले. प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक नासिर खान यांनी फातिमा शेख यांच्या जीवनचर्या व कार्याचा आढावा सादर केला. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबिद खान यांनी केले. तर आभार नसरीन शेख यांनी मांनले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी फरहाना सय्यद, नफीसा खान, इरफाना खान, अनीसा शेख आदिंनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.