Header Ads

SavitriPhule: महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर - बाळासाहेब बोर्डे

SavitriPhule: डॉ.ना.ज.पाउलबुधे तंत्रनिकेतनमध्ये सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त अभिवादन

SavitriPhule: महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर - बाळासाहेब बोर्डे


SavitriPhule: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळेच

महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर - बाळासाहेब बोर्डे


     SavitriPhule: अहमदनगर (प्रतिनिधी) -  क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या त्या काळातील त्यागामुळेच आज महिला शिक्षित होऊन सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. आजच्या सावित्रींच्या लेकींना ज्योतीबांची साथ मिळाली तरच त्यांचे व्यक्तीमत्व खर्‍या अर्थाने विकसित होऊ शकते. आज प्रत्येक घरात सावित्री आहेत, परंतु त्यांच्या व्यक्तीमत्वांना प्रोत्साहन देणारे ज्योतिबा निर्माण होणे गरजेचे आहे. स्त्री आणि पुरुष हे समाजाची दोन चाके आहेत, ही चाके बरोबर चाललीतर समाजाचा विकास होऊ शकतो, असे प्रतिपादन बाळासाहेब बोर्डे यांनी केले.


      डॉ.ना.ज.पाउलबुधे तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य बाळासाहेब बोर्डे, मॅकेनिकल विभागाचे सुदर्शन लोखंडे, श्रीमती रेखा रोटे, विद्युत विभागाचे विश्वनाथ आदवडे आदि उपस्थित होते.


     यावेळी श्रीमती रेखा रोटे म्हणाल्या, आजच्या स्त्री स्वातंत्र्याचे  सर्वश्रेय हे सावित्रीबाईंना जाते. महिलांनीच महिलांच्या विकासासाठी पुढे आले पाहिजे. आज स्त्रीभ्रुण हत्या होत आहे, महिलांवर अन्याय होत आहेत. या अन्याया विरोधात महिलांनी सक्षमपणे उभे राहिले पाहिजे. ही त्यांच्या कार्याची प्रेरणा असेल.


     यावेळी प्रथमवर्ष संगणक विभागातील विद्यार्थींनी वैष्णवी इंगळे, क्रांती म्हस्के यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. यावेळी सुदर्शन लोखंडे यांनी तंत्रनिकेतच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.