Header Ads

School Ahmednagar: लोकशाहीत मतदार हा सर्वात महत्वाचा घटक -प्राचार्य बारगळ

लोकशाहीत मतदार हा सर्वात महत्वाचा घटक -प्राचार्य बारगळ


School Ahmednagar: लोकशाहीत मतदार हा सर्वात महत्वाचा घटक -प्राचार्य बारगळ     अहमदनगर (प्रतिनिधी)  - अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्यावतीने रुपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूल, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ‘राष्ट्रीय मतदार दिन’ विविध उपक्रमांतून साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य अजयकुमार बारगळ, उपप्राचार्या वंदना आरण्ये, पर्यवेक्षक बाळासाहेब वाबळे आदि उपस्थित होते.


     याप्रसंगी प्राचार्य अजयकुमार बारगळ म्हणाले, आपल्या देशाने लोकशाही स्विकारली आहे, यामध्ये मतदार हा सर्वात महत्वाचा घटक आहे. आज राष्ट्रीय मतदार दिन लोकशाहीत मतदानाच्या अधिकाराचं महत्त्व नेमकं काय? तसेच हा हक्क बजावल्याने समाजात काय परिणाम होऊ शकतो? मतदारांची भूमिका नेमकी कोणती असावी? याबद्दल नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. 


जगातली सर्वात मोठी लोकशाही अशी ओळख असलेल्या भारताची लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी मतदान कसं महत्त्वाचं आहे याबाबत नागरिक व नवमतदारांमध्ये जागृती केली असल्याचे सांगितले.


     राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी निबंध, वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला, भित्तीपत्रक, रिल, गाणे, घोषवाक्य आदि स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच बॅण्ड पथकसह प्रभात फेरी काढून मतदानविषयी जनजागृती करण्यात आली. मतदान जागृतीचे फलक, घोषवाक्य, घोषणांनी नागरिकांचे लक्ष वेधले. यासाठी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


     या उपक्रमाचे संस्थेच्या प्रमुख कार्यवाह श्रीमती छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा सहकार्यवाह गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी आदिंनी या उपक्रमाचे कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.