Header Ads

Shaitaan Teaser Out : अजयचा 'शैतान' टीझर रिलीज ; पहा व्हिडिओ

Shaitaan Teaser Out : अजयचा 'शैतान' टीझर रिलीज ; पहा व्हिडिओ 

Shaitaan Teaser Out : अजयचा 'शैतान' टीझर रिलीज ; पहा व्हिडिओमुंबई - Shaitaan Teaser Out : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण हा आगामी चित्रपट 'शैतान'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित झाला आहे. 'शैतान' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची वाट अनेकजण पाहात आहेत. 'शैतान' चित्रपटाचं टीझर खूप मनोरंजक आहे. या चित्रपटामध्ये आर माधवनचा एक वेगळा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. 'शैतान'चा टीझर अंगावर शहारे आणणारा आहे. या चित्रपटात अजय देवगण, आर. माधवन आणि साऊथ अभिनेत्री ज्योतिका मुख्य भूमिकेत आहेत. अजय देवगणचा 'शैतान' हा काळ्या जादूवर आधारित असलेला हॉरर चित्रपट आहे.काय आहे 'शैतान'च्या टीझरमध्ये : 'शैतान'च्या टीझरची सुरुवात आर माधवनच्या आवाजानं झाली आहे. 'शैतान'च्या टीझरमध्ये माधवन म्हणतोय की, ''हे जग पूर्णपणे बहिरे आहे. पण प्रत्येकजण माझं ऐकतो. मी काळ्यापेक्षा काळी आहे, मी फसवणुकीचा प्याला आहे. तंत्रापासून श्लोकापर्यंत मी नऊ जगांचा स्वामी आहे. मी विष आहे, मी औषध देखील आहे. शतकानुशतके मी मूकपणे सर्व काही पाहात आहे, मी मूक साक्षीदार आहे.'' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तंत्रसिद्धी विधीची तयारी होताना दिसत आहे. या चित्रपटामध्ये आर माधवन हा खलनायक अवतारात दिसणार आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये अजय देवगण आणि ज्योतिका यांच्या चेहऱ्याची झलक पाहायला मिळते. दोघांच्याही चेहऱ्यावर भीती दिसत आहे. टीझरच्या शेवटी माधवन भीतीदायक हसताना दिसत आहे.


दिग्दर्शक विकास बहलचा थ्रिलर 'शैतान' 8 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाद्वारे ज्योतिका बऱ्याच काळानंतर हिंदी चित्रपटांमध्ये पुनरागमन करत आहे. दरम्यान, तिनं अनेक साऊथ चित्रपटात काम केलं आहे. माधवन स्वत: बर्‍याच काळानंतर 


हिंदी चित्रपटात रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. यापूर्वी त्यानं अनेक ओटीटी शोमध्ये काम केलंय.दरम्यान अजय देवगणबद्दल बोलायचं झालं तर तो रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम 3 मध्ये' दिसणार आहे. त्याचा हा चित्रपट 14 ऑगस्ट 2024 रोजी रुपेरी पडद्यावर दाखल होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.