Header Ads

Ahmednagar AIMIM: जे घडले ते खूप धक्कादायक- डॉ परवेज अशरफी

 एम आय एम तर्फे वकील संघटनेच्या आंदोलनाला पाठींबा

Ahmednagar AIMIM: जे घडले ते खूप धक्कादायक- डॉ परवेज अशरफीअहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात वकील दाम्पत्याचे अपहरण करून अमानुष रीतीने गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हत्या केली. त्याचे अहमदनगर ऑल इंडिया मजलिस ए इतेहादुल मुस्लीमिन पक्षातर्फे निषेध व्यक्त करण्यात आले. वकील संरक्षण कायदा होण्यासाठी एम आय एम चा पूर्ण पाठींबा असल्याचे एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले.

डॉ अशरफी म्हणाले की अगोदर वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांवर हल्ले खूप वाढले होते. कोणताही कारण नसतांना किंवा शुल्लक कारणावरून रुग्णालयात तोडफोड लोक करायचे परंतु जेव्हा आरोपीला जामीन मिळायला अवघड झाले तेव्हा डॉक्टरांवर हल्ले कमी झाले. तसेच विधी क्षेत्रामध्ये पण हल्ले वाढलेले असल्याचे दिसते. त्यामुळे वकील संरक्षण कायदा होणे आणि त्याची अमलबजावणी होने खूप गरजेचे आहे. 

एम आय एम प्रदेश अध्यक्ष व खासदार इम्तियाज जलील आणि प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी यांच्याशी चर्चा झाली असून कायदा होण्यासाठी व आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी योग्य पाठपुरावा करणार असल्याचे डॉ परवेज अशरफी यांनी सांगितले. 

पाठिंब्याचे पत्र देतांना एम आय एम जिल्हाध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा उपाध्यक्ष मुफ्ती अल्ताफ, युवा शहराध्यक्ष अमीर खान, विद्यार्थी शहर अध्यक्ष सनाउल्ला तांबटकर, इम्रान शेख, कैसर सय्यद आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.