Header Ads

Ahmednagar Bal Kavya Sammelan: रविवारी अहमदनगरला राज्यस्तरीय बालकुमार काव्य संमेलन

Ahmednagar Bal Kavya Sammelan:   रविवारी अहमदनगरला राज्यस्तरीय बालकुमार काव्य संमेलन

Ahmednagar Bal Kavya Sammelan: रविवारी अहमदनगरला राज्यस्तरीय बालकुमार काव्य संमेलन

मुख्याध्यापक, शिक्षक, पत्रकार यांना पुरस्कार वितरण    अहमदनगर (प्रतिनिधी) - मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रविवार दि.25 फेब्रुवारी 2024 रोजी स. 10 वा. वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे शैक्षणिक संकुल येथे राज्यस्तरीय बालकुमार काव्य संमेलन आयोजित केले असून, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक, पत्रकार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती दोस्ती फौंडेशनचे अध्यक्ष रज्जाक शेख यांनी दिली.


     यावेळी राज्याचे  सहसंचालक रमाकांत काठमोरे (एस.सी.ई.आर.टी.) यांच्या हस्ते उद्घाटन होईल. स्वागताध्यक्ष मंडळाचे सहसचिव आर.ए.देशमुख तर कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिनेते बाल साहित्यिक धोंडीरामसिंह राजपुत हे आहेत.


     या कार्यक्रमास वाहतुक शाखेचे शमुवेल गायकवाड, शिक्षण विस्तार अधिकारी रविंद्र कापरे, विश्वस्त आर.डी.बुचकुल, दादासाहेब भोईटे, साई पाउलबुधे, डॉ.श्रद्धा पाउलबुधे, संपादक नितीन गायके, सुभाष सोनवणे, भाऊसाहेब कबाडी, प्रशांत वाघ, नानासाहेब जिवडे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.


     या काव्य संमेलनात सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींचा पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये पत्रकार विजय मते, समाजसेवक नाना डोंगरे, क्रिडारत्न श्वेता गवळी, मुख्याध्यापक भरत बिडवे, मुख्याध्यापिका अनिता सिद्दम, शिक्षक सौ.वर्षा कबाडी, सौ.स्मिता गायकवाड, मंगल ससे यांना शिक्षण रत्न पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.


     आयोजन समिती गजलकार रज्जाक शेख, ग्रामीण कवी आनंदा साळवे, कवी देवीदास बुधवंत, प्रा.संदिप कांबळे, प्रा.आशा गावडे, विजय वीरकर, प्रांजल वीरकर यांनी नगरमधील साहित्यक रसिक शिक्षकांना, कवींना कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.