Header Ads

Ahmednagar College: आर्थिक सक्षमता येण्यासाठी अर्थ साक्षरता काळाची गरज - कविता कोटकर

 अहमदनगर महाविद्यालयात 'अर्थसाक्षरता काळाची गरज' एक दिवसीय कार्यशाळा संपन्न


Ahmednagar College: आर्थिक सक्षमता येण्यासाठी अर्थ साक्षरता काळाची गरज - कविता कोटकरअहमदनगर (प्रतिनिधी)  -   विद्यार्थीनी अर्थ साक्षर होणे खूप आवश्यक आहे . यासाठी त्यांनी पैशाचा वापर काटकसरीने करावा, शिल्लक  पैसा समभाग बाजारात विविध ठिकाणी गुंतवणूक करावी जेणेकरुन  ते स्वतःच्या पायावर उभे राहतील. त्यासाठी आर्थिक सक्षमता येण्यासाठी अर्थ साक्षरता काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कविता कोटकर यांनी केले.

      विद्यार्थी विकास मंडळ सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठ पुणे , विद्यार्थी विकास मंडळ अहमदनगर महाविद्यालय अहमदनगर आणि अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशी कार्यशाळेचे प्राचार्य डॉ आर . जे बार्नबस यांच्या मार्गदर्शनाखाली  आयोजन करण्यात आले होते . या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा दिलिप कुमार भालसिंग यांच्या हस्ते करण्यात आले.

          उद्घाटन सत्राचा अध्यक्षीय  समारोप प्रसंगी अर्थशास्त्र  विभाग प्रमुख प्रो. डॉ. पराग कदम म्हणाले, विविध आर्थिक  फसव्या  योजना  या बद्दल विद्यार्थीनी सजग  राहवे फसव्या योजना समजण्यासाठी आपण अर्थ साक्षर होणे गरजचे आहे, असे सांगितले.

Ahmednagar College: आर्थिक सक्षमता येण्यासाठी अर्थ साक्षरता काळाची गरज - कविता कोटकर     कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात शेअर समभाग बाजार : संकल्पना व मूलभूत तत्वे हा विषय विशद करताना कविता कोटकर यांनी  विद्यार्थ्यांना  शेअर म्हणजे काय ? आय .पी .ओ म्हणजे काय ? नॅशल स्टॉक एक्सचेंज व मुंबई शेअर बाजाराचा इतिहास ,शेअस बाजारातील घटक ,कॉल ऑपशन ,पूट ऑपशन  या बद्दल माहिती दिली .  

         या गोष्टी जाणून घेण्यासाठी   विद्यार्थ्यांनी  अर्थसाक्षर होणे आवश्यक आहे . आपण आपल्या दैनंदिन जीवनात विविध मार्गाने पैसा वाचवला पाहिजे तसेच त्या पैशाची गुंतवणूक देखील केली पाहिजे, जेणेकरून आपले जीवन सुखकर होईल.

         कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात त्यांनी  शेअर बाजातील विविध ॲप बद्दल व ते कसे हाताळावे  व त्याचा सराव करून घेतला. तिसऱ्या सत्रात  अकबर पठाण यांनी यांनी शेअर बाजातील तांत्रिक  विश्लेषश या विषयाला अनुषंगून बाजाराती निर्देशांक ,बाजाराचे प्रकार ऑप्शन ट्रेडिंग कॅन्डल पॅटर्न चार्ट टाईप स्ट्रोक टाईप ऑफ स्ट्रोक हेडन शोल्डर चार्ट या बद्दल विस्तृत माहिती दिली . 

     या सत्राचा अध्यक्षीय समारोप करताना प्रा.डॉ माधव शिंदे म्हणाले की,   एस .आय . पी . मध्ये गुंतवणूक करून विद्यार्थींना छोटी सुरुवात करावी यासाठी त्यांनी रॉकेश झुंझुनवाला यांचे उदाहरण दिले त्यांनी त्यांच्या शेअर बाजार यात्रेची सुरुवात छोट्या फंडातून केली होते त्यामुळे आपण जेव्हा आपल्या कडे पैसा असेल तेव्हा त्याची गुंतवणूक आणि जेव्हा गरज असेल तेव्हा मार्केंट मधून काढून घ्यावा व आपल्या आर्थिक गरजापूर्ती  करावी,  परंतु हे करत असताना आपली आर्थिक फसवणूक होणार नाही यांची काळजी घ्यावी असे आव्हान विद्यार्थ्यांना केले .

      या कार्यक्रमास उपप्राचार्य नोयल पारगे व राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रो सुधिर वाडेकर  उपस्थित होते . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कशिस हिने केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा .डॉ भागवत परकाळ  यांनी केले .तर आभार प्रा निलेश दळवी यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा मयुर कांबळे विद्यार्थी विकास मंडळाचे विद्यार्थी व अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.