Header Ads

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

 अहमदनगर महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न

 

अहमदनगर - अहमदनगर महाविद्यालय विद्यार्थी संस्था व अहमदनगर महाविद्यालय यांच्या विद्यमाने माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला विविध भागातून नगर कॉलेजचे अनेक माजी विद्यार्थी उपस्थित होते. १९५८ - २०२१ पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळाव्याला हजेरी लावली. मेळाव्याचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर जे बार्नबस यांनी केले.


     कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत संस्थेचे सचिव डॉ. अभिजीत कुलकर्णी यांनी संस्था स्थापन करण्यामागील उद्दिष्टे व नवीन शैक्षणिक धोरणाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सक्रीय सहभागाबद्दल माहिती दिली. जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी या संस्थेचे सदस्य व्हावे असे अवाहन त्यांनी यावेळी केले.


     महाविद्यालयाच्या प्रांगणात आल्यानंतर सर्व माजी विद्यार्थी भारावून गेले होते. अहमदनगर महाविद्यालयाने आपल्याला कसे घडवले व या महाविद्यालयाचे आपल्या आयुष्यातील असलेले महत्व त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. बहूतांश माजी विद्यार्थ्यांनी असे मेळावे वारंवार घेण्यात यावेत यावर भर दिला व त्या काळतील आपल्या प्राध्यापकांबद्दल तसेच संस्थापक डॉ. बी पी हिवाळे सर व प्राचार्य बार्नबस सरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


    अहमदनगर महाविद्यालयातील विनाअनुदानित विभागांचे समन्वयक डॉ. सय्यद रज्जाक, उपप्राचार्य श्री. दिलीपकुमार भालसिंग, उपप्राचार्य डॉ. प्रितमकुमार बेदरकर, रजिस्ट्रार श्री. पिटर चक्रनारायण तसेच संस्थेचे संचालक मंडळातील सदस्य व उपप्राचार्य प्रा. विनीत गायकवाड यावेळी आवर्जुन उपस्थित होते.


        हा स्नेहमेळावा घडवून आणण्यासाठी प्रा. प्रतूल कसोटे, डॉ. सनी रुपवते, प्रा. विशाल कसाब, प्रा. विशाल तुंगीकर व प्रा. सागर बावके यांनी विशेष परिश्रम घेतले.


      कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. ऐश्वर्या सागडे यांनी केले तर संस्थेचे सहसचिव डॉ. सचिन राळेगणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. 

Ahmednagar College: अहमदनगर महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.