Header Ads

Ahmednagar Congress: लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने परिवर्तनाचे वातावरण : बाळासाहेब थोरात

 Ahmednagar Congress:  कॉग्रेसच्या पदाधीका-यांचे  प्रशिक्षण शिबीर संपन्न 

Ahmednagar Congress: लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने परिवर्तनाचे वातावरण : बाळासाहेब थोरात                 अहमदनगर (प्रतिनिधी) -जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने नगर दक्षीण लोकसभा मतदार संघातील  पदाधीका-यांचे प्रशिक्षण शिबीर संपन्न झाले यावेळी  कॉग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते आ बाळासाहेब थोरातआ.लहू कानडे,जिल्हा अध्यक्ष जयंत वाघबाबासाहेब गुंजाळ,उत्कर्षा रुपवते,लताताई डांगे,किरण काळे,प्रताप शेळके,संपतराव म्हस्के,ऍड कैलास शेजूळ,ज्ञानदेव वाफारे,


मा नगराध्यक्ष मनोहर पोटे,युवक जिल्हाध्यक्ष भैय्या वाबळे आदी सह  तालुका कॉंग्रेसचे पदाधीकारी,मंडळ कॉग्रेसने पदाधीकारी,तालुका पातळीवरील सेल व संघटना यांचे तालुका अध्यक्ष व जिल्हा कॉंग्रेसचे पदाधीकारी तसेच बीएलए प्रतिनिधी मोठ्या संख्नेने  उपस्थित होते.

 

          आ थोरात म्हणाले लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने परिवर्तनाचे वातावरण आहे,नगर मध्येही बदल दिसून येत आहेतसा अनेक सर्व्हेचा अंदाज आहे,देशात इंडिया आघाडी व राज्यात महविकास आघाडी यशश्वीपणे जिकेलं या लढाईसाठी काँग्रेसचे महत्वपूर्ण योगदान असेल नुकतेच निवडणूक आयोगाने बूथ लेव्हल एजंट(बीएलए)च्या नियुक्त्या पक्षाला  करायला सांगितल्या आहेत.


 नवीन नियमानुसार ८० वर्षांपुढील लोकांना घरी मतदान करता येणार आहे. यावेळी प्रत्येक पक्षाचा एक एजंट उपस्थित ठेवला जाणार आहे. त्याची नियुक्ती तालुका अध्यक्षाने करावयाची असून त्याला तहसीलदार मान्यता देणार आहे. त्यामुळे या पदाला खूप महत्व राहणार आहे त्यामुळे त्याचे प्रशिक्षण,कामाची माहिती, बूथ कमिटी आदीची आत्तापासून तयारी करावी असेही आ थोरात म्हणाले.

 

            जिल्हा कॉग्रेसच्या या प्रशिक्षण शिबीरात कॉंग्रेस पक्षाचे संघटनात्मक कामकाजपंचायत समीती गणाच्या पातळीवरील मंडल कॉंग्रेसचे संघटनग्रामकॉग्रेस व बुथ कमेटी बाबतचे संघटनसंघटनात्मक कामकाजाची रुपरेषा आदी  बाबत मान्यवरांनी मार्गदर्शन केले तर प्रशासकीय कामकाजाची माहिती आ कानडे यांनी दिली तर आभार जयंत वाघ यांनी मानले व सूत्रसंचालन ज्ञानदेव वाफारे यांनी केले यावेळी अनेक नियुक्त्या हि करण्यात आल्या 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.