Header Ads

Ahmednagar Electrical Contractors: इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असो.चे मुंबई येथे भव्य प्रदर्शन

 इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असो.चे मुंबई येथे दि.27 ते 29 दरम्यान विद्युत साहित्याचे भव्य प्रदर्शन ; नगर विभागाच्यावतीने प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन

इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असो.चे मुंबई येथे दि.27 ते 29 दरम्यान विद्युत साहित्याचे भव्य प्रदर्शन ; नगर विभागाच्यावतीने प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन
    अहमदनगर (प्रतिनिधी)  - इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (इकॅम), ही संघटना आपले शताब्दी वर्ष साजरे करीत आहे.  संघटनेच्या शताब्दी वर्षा निमित्त विद्युत सुरक्षा उदिष्ट डोळ्यापुढे ठेऊन दि. 27, 28, 29 फेब्रुवारी 2024 रोजी  ‘इकामॅक्स 24’ या भव्य प्रदर्शनाचे आयोजन हॉल नं 2. नेस्को गोरेगाव, मुंबई येथे केले आहे.हे प्रदर्शन सर्वासाठी विनामूल्य सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजे पर्यंत खुले राहणार आहे.


     या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार दि. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता होणार आहे. प्रमुख उपस्थिती मध्ये मुख्य प्रायोजक पॉलिकॅब, आर आर काबेल, ग्रेटव्हाईट या उत्पादक कंपन्या व अनेक संघटना, वीजवितरण, व विद्युत व्यवसायाच्या निगडित संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. विद्युत क्षेत्रातील देश व विदेशातील नामवंत उत्पादक व वितरक या प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. 


या प्रदर्शनात वेगवेगळ्या जागतिक दर्जाचे विद्युत क्षेत्रातील तज्ञाची व्याख्याने सलग तीन दिवस आयोजित करण्यात आली आहेत. तरी नगर जिल्ह्यातील इलेक्ट्रिकल क्षेत्रात कार्यरत असणार्‍यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगर विभागाचे सचिव अर्जुन ससे यांनी केले आहे.


     हे प्रदर्शन पाहण्यासाठी या प्रदर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून इलेक्ट्रिकल कॉट्रॅक्टर्स, बिल्डर्स, कन्सल्टंट, इंजिनिअर्स, बांधकाम व्यावसायिक, अंतर्गत सजावटकार, शासकीय, निमशासकीय अधिकारी, आर्किटेक्ट, ग्राहक व इंजिनिअरिंगचे कॉलेजचे विद्यार्थी भेट देणार आहेत.


     या प्रदर्शनात जनरेटर, ट्रान्सफॉर्मर, सोलार, इव्ही, युपीएस, स्टॅबिलाझयर, वायर्स, केबल्स, स्विचेस, पाईप, इन्व्हर्टर, सीटीपीटी, पोल, फीडर, पॅनेल्स, लाईट्स, इन्स्ट्रमेंट्स, ऑटोमेशन इत्यादी उत्पादक कंपनी सहभागी झाल्या आहेत तसेच क्रेडाई. सीएमा, ईएमा, कास्मा, ईमा आदी संघटना या प्रदर्शनात सहयोगी होत आहेत. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, उद्योग संघटना, महावितरण, टाटा पॉवर, अदानी इलेक्ट्रीक यांचे भरीव सहकार्य लाभले आहे. प्रदर्शनात आय.एस.आय., आय.एस.ओ. उत्पादक सहभागी होत असलेने ग्राहकांना दर्जेदार उत्पादने पाहण्याची अभ्यासण्याची संधी मिळणार आहे.


     विद्युत अपघात होऊ नयेत, विद्युत अपघात मुक्त भारत घडविणे, यासाठी इकॅम सतत कार्यरत असते. या प्रदर्शनाचा मुख्य हेतू विद्युत सुरक्षा हा ठेवला आहे. सर्व विद्युतिकरणाची कामे ही मान्यता प्राप्त विद्युत ठेकेदरांकडूनच करून घेणे हा कायदेशीर संदेश सर्वसामान्य जनते पर्यंत जावा यासाठी इकॅम सतत प्रयत्न करत असते.


     इकॅम संघटनेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे असून संघटनेचे पाच हजार सभासद आहेत. महाराष्ट्रात संघटनेचे आठ विभाग काम करत आहेत यामध्ये पुणे, नाशिक, नगर, धुळे नंदुरबार, जळगाव, पश्चिम महाराष्ट्र, ठाणे, कोकण येथे विभागीय कार्यालय आहेत. सभासद केंद्रबिंदू मानून 100 वर्षे अविरत काम करणारी इकॅम ही एक नामांकित आणि वैभवशाली इतिहास लाभलेली जागतिक लेवलची संघटना आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.