Header Ads

Ahmednagar News: कष्टकरी महिलेला लकी ड्रॉ मध्ये मिळाली लाखाची गाडी ; पहा व्हिडीओ

 

 Ahmednagar News: संवेदना फाऊंडेशन व नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या तर्फे  हळदीकुंकू कार्यक्रम

            अहमदनगर (प्रतिनिधी)-हॉटेल मध्ये भाडे घासण्याचे काम करणाऱ्या अनिता परमेश्वरी या महिलेला १ लाख रुपयाची एसेस टू व्हिलर गाडी लकी ड्रॉ मध्ये लागली व त्यांचा आनंद गगनात मावेना त्या इतकया भावुक झाल्या  त्यांनी ड्रॉ मध्ये चिट्टी काढणाऱ्या अभनेत्री व जाधव दांपत्याच्या पाया पडल्या व माईकवर स्वतः अडाणी व भांडे घासण्याचे काम करतात असे सांगितले यावेळी उपस्थित शेकडो महिलांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

 

              निम्मित होते संवेदना फाउंडेशन व नगरसेविका सौ. अश्विनी सचिन जाधव यांच्या वतीने  नगर मधील दाळ मंडई येथे महिलांसाठी हळदी कुंकू समारंभविविध स्पर्धा व लकी ड्रॉ च्या बक्षीस वितरण समारंभ सिने अभिनेत्री तेजश्री प्रधान  यांच्या उपस्तिथीत संपन्न झाला.


 यावेळी मा. महापौर शिलाताई शिंदेफुलपाखरू या मालिकेच्या निर्मात्या सुवर्णा सांगळेउद्योजक राजेंद्र शिंदेऍड. संतोष गायकवाडमा नगरसेवक सचिन जाधव व संवेदना फाउंडेशन चे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

             अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणाल्या  नगरसेविका सौ. अश्विनी सचिन जाधव व  सचिन जाधव यांचे सामाजिक कार्य अत्यंत चांगले व दखल पात्र आहे. या दांपत्याने आपल्या भागातील जनतेची सेवा करून विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे त्यांचे भविष्य उज्वल आहे  


मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कार्यक्रमाला गेले मात्र हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी महिलांची एवढी मोठी लक्षणीय उपस्थिती मी प्रथमच अनुभवली. यावेळी खा.  सुजय  विखे व  धनश्री  विखे यांनी दिल्लीवरून व्हिडिओ कॉल द्वारे या  कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.