Header Ads

Ahmednagar News: आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सर्व रुग्णालयांना सक्तीने लागु करावा

 Ahmednagar News: आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजना महाराष्ट्रातील सर्व खाजगी व धर्मदाय रुग्णालयांना सक्तीने लागु करावा

Ahmednagar News: आयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सर्व रुग्णालयांना सक्तीने लागु करावा
सामाजिक कार्यकर्ता शाकीर शेख यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी ; मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची मागणी


अहमदनगर (प्रतिनिधी) -प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्नीकरण करुन दोन्ही योजना एकत्रित राज्यामध्ये लागु केलेले आहे. राज्यातील शासकीय व खाजगी अशा दोन्ही रुग्णालयामध्ये सदर योजना लागू असून ते योजना खाजगी व धर्मदाय रुग्णालयांना सक्तीने लागू करण्याबाबत सामाजिक कार्यकर्ता शाकीर शेख यांनी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे


प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्नीकरण करुन दोन्ही योजना एकत्रित राज्यामध्ये लागु केलेले आहे. राज्यातील शासकीय व खाजगी अशा दोन्ही रुग्णालयामध्ये सदर योजना लागू करण्यात आलेली आहे. या योजनेत एकूण १३५६ इतके आजारावरील उपचारांचा समावेश केलेला आहे. 

मात्र हि योजनाराज्यातील मोठे खाजगी रुग्णालयात लागु करण्यास संबधीत रुग्णालयाने नाकारलेले आहे. त्यामुळे या योजनेचा हेतु सभल होत नाही. छोटया रुग्णालयामध्ये मोठ्या रुग्णालयासारखी सुविधा मिळत नाही. त्यामुळे नागरिकांना या योजनेपासून वंचित रहावे लागते. 

मोठया रुग्णालयात योजने विषयी माहिती विचारल्यास सदर रुग्णालय असे उत्तरदेतात की, सदर योजना आमच्या लागु नाही, तुम्ही सरकारी दवाखान्यात उपचार घ्या, आमच्या उपचार घ्यावयाचे असेलतर तुम्हाला रोख बिल भरावेअसे उत्तर मिळते. त्यामुळे अनेक नागरिकांनी आयुष्यमान भारत जन आरोग्याचे ओळखपत्र घेऊन उपचार मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये निराश्याचे वातावरण निर्माण झालेले आहे. 

त्यामुळे शासनाने महाराष्ट्र राज्यातील सर्व खाजगी रुग्णालय व धर्मदाय रुग्णालयामध्येआयुष्यमान भारत -प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजना हे सक्तीने लागु करावी. व सदर योजनेमध्ये अनेक लहान आजाराचे समावेश करण्यात यावे व सदर योजनेचे फेर आढावा घेऊन संबधीत खाजगी रुग्णालय शासनाची सदर योजना का लागु करीत नाही. 

या बाबत विचार करुन इतर आजार बाबतदरवाढ करुन प्रश्न सोडवता येईल का याचाही शासनाने विचार करावा व सदर योजना लागु करणेबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा अशी मागणी शेख यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्याकडे केलेले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

For All Your Feedback and Complain please Mail and Contact us - at [email protected]

Blogger द्वारे प्रायोजित.